AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : पावसाची उघडीप, आता रोगराईचा प्रादुर्भाव, यंदाचा खरीप दुहेरी संकटात

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यात 30 जून ते 7 जुलै या कालावधीत खरीप हंगामातील पेरणीची कामे आटोपली गेली. 8 जुलैपासून मात्र संततधार पाऊस सुरू असल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचून सोयाबीनसह तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे. तुरीला मर रोगाची लागण झाल्याने त्याचे निवारण करता येणेही अशक्य झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

Washim : पावसाची उघडीप, आता रोगराईचा प्रादुर्भाव, यंदाचा खरीप दुहेरी संकटात
पावसाने उघडीप दिली असली तरी आथा ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 10:32 AM
Share

वाशिम : खरिपाची पेरणी होताच राज्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, सरासरीपेक्षा अधिक तर पाऊस झाला पण सलग 18 दिवस त्यामध्ये सातत्य राहिल्याने (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी साचून राहिल्याने पिकांची वाढ तर खुंटलीच आहे पण आता उत्पादनावर काय परिणाम होऊ नये मशागतीची कामे सुरु करण्यात आली आहेत. असे असतानाच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे या खरिपातील सर्वच पिकांवर (Insect disease) किड-रोगराईचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. (Soybean) सोयाबीनवर शंकू गोगलगाय तर तुरीला मर रोगाने घेरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. पिके जोपासावी कशी असा एकच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाण्यात पिके राहिल्याने हा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता फवारणी आणि मशागत केली तरच खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहेत. सध्या पावसाने उघडीप दिली असून या कालावधीतच शेतकऱ्यांना ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

पेरणी होताच वरुणराजाची हजेरी

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यात 30 जून ते 7 जुलै या कालावधीत खरीप हंगामातील पेरणीची कामे आटोपली गेली. 8 जुलैपासून मात्र संततधार पाऊस सुरू असल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचून सोयाबीनसह तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे. तुरीला मर रोगाची लागण झाल्याने त्याचे निवारण करता येणेही अशक्य झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. एकूणच या सर्व समस्यांमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रशासनाची भूमिका महत्वाची

शेतकऱ्यांनी महागडी बियाणे अन् खत खरेदी करुन यंदाची पेरणी केली आहे. असे असताना पिकांची उगवण होताच नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत पावसाचे थैमान आणि आता कीड-रोगराईचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भारही वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनवर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट ही जवळपास निश्चित मानली जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन सर्वेक्षण करावे आणि विनाविलंब भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काय आहे उपाययोजना?

जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन मर रोगासाठी प्रतिकारक असलेले नवीन शिफारशीत वाण उदाहरणार्थ पीकेव्ही तारा, बीएसएमआर 736, बीडीएन 716, बीएसएमआर 853 यासारख्या वाणाची पेरणी करावी परंतु वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची इतर वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेऊनच वाण निवडावे लागणार आहे. तर दुसरीकडे सोयाबीनवर शंकू गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी गोगलगायींना साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावे लागणार आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.