Summer Season: ज्वारीचे क्षेत्र घटले तरी चाऱ्याची चिंता कशाला? शेतकऱ्यांनी शोधला हा पर्याय..!

Summer Season: ज्वारीचे क्षेत्र घटले तरी चाऱ्याची चिंता कशाला? शेतकऱ्यांनी शोधला हा पर्याय..!
यंदा उन्हाळी हंगामात मराठवाड्यात मकाचे क्षेत्र वाढलेले आहे.

केवळ उत्पन्नासाठीच नाही तर कडब्याच्या स्वरुपातून चाऱ्याचा प्रश्न मिटत असल्याने हे पीक मराठवाड्यात कायम टिकून राहिले आहे. पण शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार कडधान्य पिकांवर भर दिलेला आहे. अशा परस्थितीमध्ये चाऱ्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी मकाची लागवड केली आहे.

राजेंद्र खराडे

|

Jan 20, 2022 | 7:00 AM

औरंगाबाद : (Rabi Season) रब्बी हगांमात मुख्य पीक असलेल्या ज्वारीची जागा यंदा हरभरा या पिकाने घेतली आहे. (Marathwada) मराठवाड्यातील ज्वारीला वेगळे महत्व असले तरी गेल्या तीन वर्षात परतीच्या पावसामुळे ज्वारी पेऱ्याचे गणितच बिघडत आहे. शिवाय पाच महिने जोपासूनही ज्वारीला मिळणारा दर आणि काढणीसाठी होणारी परवड यामुळे सरासरीपेक्षाही यंदा कमी क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. केवळ उत्पन्नासाठीच नाही तर कडब्याच्या स्वरुपातून चाऱ्याचा प्रश्न मिटत असल्याने हे पीक मराठवाड्यात कायम टिकून राहिले आहे. पण शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार कडधान्य पिकांवर भर दिलेला आहे. अशा परस्थितीमध्ये चाऱ्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शेतकऱ्यांनी (Maize Cultivation) उन्हाळी मकाची लागवड केली आहे. मका ही जनावरांसाठी पोषक शिवाय ज्वारीपेक्षा अधिकचा दर यामुळे शेतकऱ्यांनी दुहेरी उद्देश साध्य करीत मका लागवडीवरच भर दिला आहे.

खरिपातील नुकसान रब्बीत भरुन निघणार

वातावरणातील बदलाचा परिणाम हा सर्वच पिकांवर झालेला आहे. त्याचप्रमाणे परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील मका आणि कापसाचे नुकसान झाले होते. शिवाय ढगाळ वातारणामुळे या पिकावर कीडीचा प्रादुर्भावही झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी या पिकाला बाजूला सारत गहू आणि मका पिकाच्या पेरणीत वाढ केली आहे. पावसामुळे यंदाही रब्बी हंगामात शेतजमिनीची मशागत करण्यास अडचणी निर्माण झाली होती. उशिरा झालेल्या पेरणीतून उत्पादन घटीचा कायम धोका होताच म्हणून उत्पन्न आणि जनावरांचा चारा प्रश्न मिटावा म्हणून शेतकऱ्यांनी मका या चारा पिकावरच भर दिला आहे.

सरासरीपेक्षा तीपटीने मक्याचा पेरा

मका हे चारा पीक असले तरी मक्याचे दर ही दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दोन वर्षात मक्याच्या पेऱ्यात दुपटीने वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर तर पेरा होतोच पण यंदा तब्बल 30 हजार हेक्टरावर मकाचा पेरा झाला आहे. अद्यापही मका पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. पावसामुळे अनेक क्षेत्रावर वाफसाही झालेला नव्हता. आता कुठे वाफसा झाला असून ज्वारीचा पेरा करण्यापेक्षा शेतकरी आता मका पेरणीवरच भर देत आहेत.

उन्हाळी मकाचा असा हा फायदा

उन्हाळी मका काढणीनंतर किंवा वावरात असताना पावसाने नुकसानीचा धोका नसतो. त्यामुळे जनावरांना चारा म्हणूनही याची साठवणूक करता येते. मका ही हुरड्यात आली की, जनावरांच्या चाऱ्यासाठी त्याची विक्री व्यापाऱ्याला करता येते. यामुळे वाहतूकीचा खर्च तर बाजूलाच राहतो पण मक्याचेही उत्पन्न मिळते. मक्याची कुटी ही जनावरांसाठी सकस आहार मानला जातो. या कुट्टीमुळे जनावरांच्या दुधदुभत्यामध्ये वाढ होते, शिवाय मका कुटीचा दर इतर पशूखाद्य दरापेक्षा कमी असतो. अशा दुहेरी फायद्यामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र घटले तरी चाऱ्याचा प्रश्न हा मिटलेला आहे.

संबंधित बातम्या :

Chilly : मिरचीचे उत्पादन भरघोस अन् निर्यातही विक्रमी, तरीही काय आहेत शेतकऱ्यांसमोरील अव्हाने?

Guarantee Price Centre: तुरीची नोंदणी हमी भाव केंद्रावर अन् विक्री खुल्या बाजारात

Betel Leaf Farming : सुपारी पान मळ्यांची शेती करायची कशी? जाणून घ्या कृषितज्ञांचे मत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें