Betel Leaf Farming : सुपारी पान मळ्यांची शेती करायची कशी? जाणून घ्या कृषितज्ञांचे मत

कोणत्याही उत्पादनवाढीसाठी आवश्यकता असते ती पोषक वातावरणाची. त्याचप्रमाणे पान मळ्यांच्या शेतीसाठी आवश्यकता आहे ती, उष्णकटिबंधीय हवामानाची. उंच जमिनीवर तसेच पाणथळ भागात याची लागवड करता येते. केरळमध्ये सुपारी आणि नारळाच्या बागांमध्ये प्रामुख्याने आंतरपीक म्हणून सुपारीची पानांची लागवड केली जाते.

Betel Leaf Farming : सुपारी पान मळ्यांची शेती करायची कशी? जाणून घ्या कृषितज्ञांचे मत
पान शेती
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 3:23 PM

मुंबई : कोणत्याही उत्पादनवाढीसाठी आवश्यकता असते ती पोषक वातावरणाची. त्याचप्रमाणे पान मळ्यांच्या शेतीसाठी आवश्यकता आहे ती, उष्णकटिबंधीय हवामानाची. उंच जमिनीवर तसेच पाणथळ भागात याची लागवड करता येते. केरळमध्ये सुपारी आणि नारळाच्या बागांमध्ये प्रामुख्याने आंतरपीक म्हणून सुपारीची पानांची लागवड केली जाते. या पिकासाठी सुपीक मातीच योग्य असते. तर ज्या भागामध्ये पाणी साचले जाईल किंवा ज्या ठिकाणी खारे पाणी आणि क्षारयुक्त माती असेल त्या ठिकाणी या पिकाची वाढ जोमात होत नाही. भुसभूशीत जमिन क्षेत्रावर सुपारी पानांची वाढ जोमात होते. पिकाची वाढ जोमात होण्यासाठी पाणी पुरवठा, योग्य वातावरण आणि ज्या ठिकाणी 200 ते 450 सेंमी पावसाची वार्षिक सरासरी आहे त्या ठिकाणी सुपारी पानांची वाढ होते. या पिकाच्या वाढीसाठी किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस तर जास्तीत जास्त 40 अंश पर्यंत तापमान सहन करु शकते. उष्ण आणि कोरडी हवा यासाठी धोकादायक आहे.

अशी आहे लागवडीची पध्दत

जगात सुमारे 100 प्रकारचे पान आहे, त्यापैकी सुमारे 40 भारतात आणि 30 पश्चिम बंगालमध्ये आढळतात. पानाचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. यामध्ये देसावरी, बांगला, कापूरी, मिथा आणि सांची यांचा समावेश आहे. कापुरी आणि सांची प्रामुख्याने द्वीपकल्पीय पीक भारतात केले जातात, तर बांगला आणि देसवारी सामान्यत: उत्तर भारतात घेतले जातात. पश्चिम बंगालमध्ये व्यवसायिक पातळीवर मिठाईसाठी ही पाने पिकवली जातात. हे एक भांडवल देणारे आणि नगदी पीक आहे.

असे करा व्यवस्थापन

कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंग यांच्या मते, पीकाची योग्य वाढ होण्यासाठी पिकानुसार वेल पसरणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगली फळधारणा व्हावी म्हणून 2 मीटर रुंद खाटा बनवल्या जातात. लगतच्या दोन बेडच्या मध्ये ड्रेनेज ट्रेंच 0.5 मीटर रुंदी 0.5 मीटर खोली घेतली जाते. त्यानंतर या पानाची बीजे लांब रांगांमध्ये लावावी लागणार आहेत. बेडच्या काठावर मोठी झुडपे लावली जातात, ज्याचा उपयोग आधार जगण्यासाठी वेली बांधण्यासाठी आणि सुपारीची पाने पॅक करण्यासाठी केला जातो. जेव्हा वेलीची लांबी ही 4 मीटरपेक्षा जास्त होते त्यावेळी तेव्हा उंची राखण्यासाठी त्यांना वरच्या बाजूला ठेवले जाते.

असे करा पाण्याचे नियोजन

लागवड केल्यानंतर किंवा आठवड्यातून एकदा पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर तर उगवण होतेच पण एका महिन्यात वाढही सहज शक्य होते. 15 ते 20 सेंटीमीटर वाढ झाली की पानाच्या वेलीला छताचा अधार देणे गरजेचे आहे. अशावेळी छतावर जोपासना झाली तरच योग्य वाढ होणार आहे. वेलींच्या वाढीप्रमाणे दर 15-20 दिवसांनी त्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

उन्हाळी हंगामातील नव्या प्रयोगातून निघेल का खरिपातील भरपाई? सर्वकाही पोषक असताना भीती कशाची

Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर

Untimely Rain : जिल्ह्यात अवकाळी अन् नुकसानीचा अहवाल एकाच तालुक्याचा, कृषी विभगाच्या रिपोर्टमध्ये दडलंय काय?

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.