AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season: यंदाच्या हंगामात धान पिकासाठी 2 नव्या वाणाचा समावेश, उत्पादनात होणार वाढ

भारतीय कृषी संशोधन परिषदेने गेली 8 वर्ष मेहनत घेऊन जे भाताचे वाण तयार केले आहे त्याचे नाव हे गोल्डन अॅडव्हान्स असे आहे. गेल्या वर्षी हे वाण प्रदर्शित करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपापासून ते प्रत्यक्ष वापरासाठी येणार आहे. या वाणाचा पेरा झाला केला तर चार महिन्यामध्ये पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. विशेष म्हणजे या वाणाची उत्पादकता ही इतरांच्या तुलनेने अधिक आहे.

Kharif Season: यंदाच्या हंगामात धान पिकासाठी 2 नव्या वाणाचा समावेश, उत्पादनात होणार वाढ
धान शेती
| Updated on: May 02, 2022 | 5:17 AM
Share

मुंबई : रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून आता खरिपाचे वेध लागले आहेत. मराठवाड्यात ज्याप्रमाणे सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे त्याचप्रमाणे विदर्भात आणि देशाच्या इतर भागात धान शेती अर्थाच (Rice Crop) भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही देशाच्या मोठ्या भागात धानाची पेरणी आणि प्रत्यारोपण केले जाणार आहे, मात्र येत्या (Kharif Season) खरीप हंगामात शेतकऱ्यांना भात पेरणी आणि रोपलावणीसाठी अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहेत. यंदा खरीपातील (Production Increase) उत्पादन वाढवण्याची संधी शेतकऱ्यांकडे असणार आहे. यामध्ये भाताच्या दोन नव्या जातींचे लागवडही शेतकऱ्यांना करता येणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने हे वाण विकसित केले असून यामुळे उत्पादन कसे वाढणार आहे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास असणे तेवढेच गरजेचे आहे.

एका एकरामध्ये 55 क्विंटलचे उत्पादन

भारतीय कृषी संशोधन परिषदेने गेली 8 वर्ष मेहनत घेऊन जे भाताचे वाण तयार केले आहे त्याचे नाव हे गोल्डन अॅडव्हान्स असे आहे. गेल्या वर्षी हे वाण प्रदर्शित करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपापासून ते प्रत्यक्ष वापरासाठी येणार आहे. या वाणाचा पेरा झाला केला तर चार महिन्यामध्ये पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. विशेष म्हणजे या वाणाची उत्पादकता ही इतरांच्या तुलनेने अधिक आहे. संशोधन परिषदेच्या अंदाजानुसार या वाणामुळे एकरी 55 क्विंटल उत्पादन मिळेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय वातावरणातील बदलाचा या वाणावर अधिकचा परिणाम होणार नाही तर याकरिता पाणीही कमी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या वाणामुळे बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यंदाच्या हंगामापासून करता येणार लागवड

भौगोलिक परस्थितीचा विचार करुन हे वाण विकसित करण्यात आले आहे. नावाप्रमाणेच शेतकऱ्यांना या वाणातून अॅडव्हान्स उत्पादन मिळणार आहे. आयसीएआर ने दिलेल्या माहितीनुसार हे गोल्डन वाण श्रेणीसुधार केलेले आहे. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशामधील शेतकरी हे या वाणाची लागवड करु शकणार आहेत. एकंदरीत, आयसीएआरने या प्रदेशांची वैशिष्ट्ये आणि गरजा लक्षात घेऊन गोल्ड अॅडव्हान्स्ड व्हरायटी विकसित केली आहे. 10 ते 15 जून दरम्यान या वाणाची पेरणी करता येईल.

गोल्डन वाणासाठी उत्तर प्रदेशातील वातावरण पोषक

आयसीएआरने विकसित केलेल्या धानाची दुसरी जात म्हणजे सोन्याचे कोरडे धान. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत सरकारने भाताचे वाण प्रसिद्ध केले होते. ज्याअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच शेतकऱ्यांना या जातीच्या भाताची लागवड करता येणार आहे. उत्तर प्रदेशातील पर्जन्यछायेच्या जमिनीसाठी ते अतिशय प्रभावी आहे. गोल्ड़न वाण हे पर्जन्य छायेच्या भागात अधिक परिणामकारक राहणार आहे. उत्तर प्रदेशातील दुष्काळग्रस्त पर्जन्यछायेच्या भागात पेरली जाऊ शकते. आयसीएआरच्या मते, या जातीच्या धानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा उपयोग पर्जन्यछायेच्या जमिनीत थेट पेरणीसाठी केला जाऊ शकतो. एक हेक्टरमध्ये या वाणाची लागवड केल्यास 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकते शिवाय 110 ते 115 दिवसांमध्ये हे पीक पदरात पडते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.