शेतकऱ्यांना सक्षम बनवणारं ठाकरे सरकारचं विकेल ते पिकेल अभियान नेमक काय? वाचा सविस्तर

ठाकरे सरकारनं त्यापुढं जात ऑक्टोबर 2020 मध्ये विकेल ते पिकेल अभियान सुरु केलं आहे. Vikel Te Pikel Programme

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 11:46 AM, 8 Mar 2021
शेतकऱ्यांना सक्षम बनवणारं ठाकरे सरकारचं विकेल ते पिकेल अभियान नेमक काय? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना सुरु करण्यात आली. ठाकरे सरकारनं त्यापुढं जात ऑक्टोबर 2020 मध्ये विकेल ते पिकेल अभियान सुरु केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकेल ते पिकेल या योजनेचा उल्लेख करतात. महाविकासआघाडी सरकारच्या विकेल ते पिकेल या अभियानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. (Uddhav Thackeray Government launched Vikel Te Pikel Programme for Farmers know details)

विकेल ते पिकेल अभियान कुणासाठी?

महाविकासआघाडी सरकारनं विकेल ते पिकेल अभियान राज्याली अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु केले आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याचं राज्यातील प्रमाण 81 टक्के असून 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व ग्राहकांच्या मागण्या निश्चित करणे, शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणं असा या अभियानाचा उद्देश आहे.

 1. विकेल ते पिकेल योजनेचे उद्देश.
 2. मागणीप्रमाणे पीकपद्धतीत बदल करणे.
 3.  शेतीमालाची गुणवत्ता वाढवणे.
 4. शेतीव्यवसाय आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे.
 5. शेतीमालाच्या विक्रीसाठी ब्रँड विकसित करणे.
 6.  मूल्य साखळी विकास प्रकल्पांच्या माध्यमांतून विक्री वाढीव संधी उपलब्ध करुन देणे.
 7. शेती व्यवसाय सुलभतेसाठी नवीन धोरण आखणे.
 8. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे.
 9. शाश्वत शेती उत्पन्न व उत्पादकता वाढवणे.
 10. बाजाशी संबंधित माहितीचे विश्लेषण करुण शेतकऱ्यांना माहिती देणे.

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत विक्री कुणाला?

विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत ग्राहकांना व व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री केली जाणार आहे. प्रक्रिया केललेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

अभियानाची अंमबलबजावणी कोण करणार?

विकेल ते पिकेल अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाचे विभाग आणि नाबार्ड यांच्या मार्फत केली जाईल. संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत सप्टेंबर 2020 पासून 76 आठवडे बाजार कार्यरत आहेत. हे अभियान विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत राबवण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :

…तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अ‍ॅक्शन मोडमध्ये

मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश

(Uddhav Thackeray Government launched Vikel Te Pikel Programme for Farmers know details)