कोरोनाच्या संकटात कलिंगड शेतीनं दिला आधार, दोन एकरात शेतकऱ्यानं 6 लाखांचं उत्पन्न मिळवलं

थेट ग्राहकांना कलिंगड विक्री केल्यानं आतापर्यंत राजू चौधरींना सहा लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. Washim Raju Chaudhari Watermelon

कोरोनाच्या संकटात कलिंगड शेतीनं दिला आधार, दोन एकरात शेतकऱ्यानं 6 लाखांचं उत्पन्न मिळवलं
राजू चौधरी

वाशिम: राज्यात कोरोना व्हायरस मुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत दोन एकरात कलिंगडाची लागवड केली आहे. त्यांना यापासून एकरी 30 टन उत्पन्न मिळालं आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच बैलगाडी मधून 10 ते 15 रुपयांना एक किलो प्रमाणं विक्री करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना निर्बंधाच्या काळातही थेट ग्राहकांना कलिंगड विक्री केल्यानं आतापर्यंत त्यांना सहा लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. लागवड खर्च वगळता त्यांना पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. (Washim Farmer Raju Chaudhari earn six lakh rupees from Watermelon Farming)

शेतकरी ते ग्राहक विक्री

कामरगाव येथील राजू चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी दोन एकरात कलिंगडाची लागवड केली. मात्र, कलिंगड विक्रीला आले असता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागल्यामुळे विक्री कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, चौधरी यांनी आपल्या बैलगाडीमधून विक्री सुरू केली. थेट ग्राहक ते शेतकरी यापद्धतीने चांगला प्रतिसाद मिळाला असून 10 ते 15 रुपये भाव मिळाला त्यामुळं त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे.

स्वत:च विक्री केल्यानं फायदा

कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागल्याने बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.मात्र, राजू चौधरी यांनी स्वतःच कलिंगडाची विक्री केल्यामुळं त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनी ही यांच्या प्रमाणे पिकविलेला शेतमाल स्वतः विक्री केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही.

पत्नी आणि मुलाचं सहकार्य

राजू चौधरी यांनी कलिंगडची लागवड फेब्रुवारी महिन्यात केल्याची माहिती दिली. बाजारात विक्री करण्याच्या वेळी लॉकडाऊन लागल्यानं अडचणी आल्या असं ते सांगतात. राजू चौधरी यांनी पत्नी आणि मुलाच्या सहकार्यानं थेट ग्राहकांना 10 ते 15 रुपये किलो प्रमाणं कलिंगड विक्रीस सुरुवात केली. व्यापारी त्यांच्याकडे 5 रुपये किलोनं मागणी करत होते. मात्र, स्वत: विक्री केल्यानं फायदा झाल्याचं ते सांगतात.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात

एक रुपयाही खर्च न करता घर बसल्या कमवा पैसे, या 8 सोप्या पद्धती तुम्हीही वापरा

(Washim Farmer Raju Chaudhari earn six lakh rupees from Watermelon Farming)