Diphtheria : ‘घटसर्प’ जनावरांमधला जीवघेणा आजार, लक्षणे अन् काय आहेत उपाय?

Diphtheria : 'घटसर्प' जनावरांमधला जीवघेणा आजार, लक्षणे अन् काय आहेत उपाय?

पशूपालन हा शेती व्यवसयाचा मुख्य जोड व्यवसाय असला तरी त्याच पध्दतीने तो जोपासणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल हा जनावरांवरदेखील पाहवयास मिळतात. पावसाळ्याच्या तोंडावर घटसर्प ह्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जनावरांमध्ये आढळून येतो. त्यालाच हेमोरॅजिक सेप्टिसिमिया नावाचा एक धोकादायक आजार असेही म्हणतात. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरे दगावण्याचाही धोका असतो.

राजेंद्र खराडे

|

May 29, 2022 | 6:07 AM

मुंबई : (Animal husbandry) पशूपालन हा शेती व्यवसयाचा मुख्य जोड व्यवसाय असला तरी त्याच पध्दतीने तो जोपासणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल हा जनावरांवरदेखील पाहवयास मिळतात. (Rain Season) पावसाळ्याच्या तोंडावर (Diphtheria) घटसर्प ह्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जनावरांमध्ये आढळून येतो. त्यालाच हेमोरॅजिक सेप्टिसिमिया नावाचा एक धोकादायक आजार असेही म्हणतात. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरे दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच लसीकणरण करुन घेणे हाच यामधील सर्वोत्तम पर्याय आहे. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या गावोगावी लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलाही विलंब न करता लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. विशेषत: गाई आणि म्हशीमध्येच याची लक्षणे आढळतात. शिवाय हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलावही लवकर होतो. दरवर्षी देशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची सुमारे 8 लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. अशा परिस्थितीत पशुपालन आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे आपण समजू शकतो. प्राण्यांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे? हा आजार मे-जूनमध्ये होतो.हा एक जिवाणूजन्य रोग आहे. त्यामुळे त्याच्याविषयी माहिती असून उपचार पध्दती जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे.

असा होतो रोगाचा प्रादुर्भाव

पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. शिवाय अस्वच्छ असलेल्या ठिकाणी जनावरे बांधली किंवा लांबचा प्रवास किंवा अतिकाम करून थकलेल्या प्राण्यांवर या आजाराचे जीवाणू हल्ला करतात. रोगाचा प्रसार खूप वेगाने होतो. आजारी जनावरांचा चारा, धान्य आणि पाणी यांचे सेवन आणि इतर जनावरे संपर्कात आली तर हा आजार होतोच . तसेच मादी प्राण्याच्या दुधाने त्याचा प्रसार होतो.

एक रुपयामध्ये लसीकरण

घटसर्पचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहिम राबवली जात आहे. पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून गावागावात जाऊन लसीकरण केले जाते आहे. शिवाय 1 रुपयामध्ये लसीकरण केले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून पशूवैद्यकीय अधिकारी कर्मचारी हे गावोगावात जाऊल लसीकरण करीत आहेत.

घटसर्पाची लक्षण काय आहेत?

* तीव्र ताप, तीव्र ताप सुमारे 105 ते 106 डिग्री फॅ. * डोळे लाल आणि सुजलेले दिसतात. * नाक, डोळे आणि तोंडातूनस्त्राव होतो * मान, डोके किंवा पुढील पायांच्या दरम्यान सूज येणे. * श्वास घेताना पुटपुटण्याचा आवाज. * श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून प्राण्याचा मृत्यू .

हे सुद्धा वाचा

घटसर्पवर असा करा इलाज

या आजारावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा जनावराचा यामध्ये मृत्यूही होऊ शकतो. घटसर्पची लक्षणे आढळून आल्यास लागलीच पशूवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करावी लागणार आहे दरवर्षी मान्सूनपूर्व गॅलिक आजाराची लस जवळच्या पशुवैद्यक संस्थेकडून घेणे आवश्यक आहे. पावसळ्यापूर्वी लसीकरण करणे गरजेचे आहे. जनावरांना घटसर्प आजाराची लक्षणे दिसताच रुग्णाने इतर निरोगी प्राण्यांपासून जनावर वेगळे करावे. रुग्ण प्राण्याला नदी, तलाव, तलाव इत्यादी ठिकाणी पाणी पिऊ देऊ नका. रुग्ण जनावराच्या आधी निरोगी जनावरांना चारा, धान्य, पाणी इत्यादी द्यावे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें