AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : सोयाबीन पाठोपाठ हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतीमालावर नेमका परिणाम कशाचा?

सोयाबीनला विक्रमी दर मिळेल ही आशा तर आता मावळली आहेच पण सरासरीएवढा दर तरी टिकून राहवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात सोयाबीनला 7 हजार 200 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय अंतिम टप्प्यात यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा असताना केंद्राने सोयापेंडची आयात केल्याने स्थानिक पातळीवरील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला.

Latur Market : सोयाबीन पाठोपाठ हरभऱ्याच्या दरात घसरण, शेतीमालावर नेमका परिणाम कशाचा?
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 07, 2022 | 3:03 PM
Share

लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात (Agricultural Good Rate) शेतीमालाच्या दरात अशी काय घसरण सुरु झाली आहे की, शेतकऱ्यांना आपला माल विकावा की साठवणूक करुन ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राने सोयापेंडची केलेली आयात आणि खाद्यतेलावरील घटलेले आयातशुल्क याचा परिणाम थेट (Soybean Rate) सोयाबीनवर झालेला आहे. तर दुसरीकडे सोयाबीनपाठोपाठ (Rabi Season) रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरही गडगडले आहेत. हरभरा 4 हजार 200 रुपयांवरच येऊन ठेपला आहे. वाढलेले उत्पादन आणि खरेदी केंद्राबाबत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय याचा परिणाम हरभरा दरावर झालेला आहे. हे कमी म्हणून की काय तुरीला हमीभावापेक्षा कमी दर खुल्या बाजारपेठेत मिळत आहे. घटत्या दरामुळे बाजार समितीमधील शेतीमालाची आवक ही घटलेली आहे. मुख्य तीन पिकांच्या बाबतीतच असे झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे.

तीन महिन्यात 1 हजार रुपयांनी घसरले सोयाबीन

सोयाबीनला विक्रमी दर मिळेल ही आशा तर आता मावळली आहेच पण सरासरीएवढा दर तरी टिकून राहवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात सोयाबीनला 7 हजार 200 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय अंतिम टप्प्यात यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा असताना केंद्राने सोयापेंडची आयात केल्याने स्थानिक पातळीवरील प्रक्रिया उद्योगावर त्याचा परिणाम झाला. उद्योजकांनी सोयाबीन खरेदीकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे तीन महिन्यात 1 हजार रुपयांनी सोयाबीन घसरले आहे. हे कमी म्हणून की काय आता उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल होऊ लागले आहे.

खरेदी केंद्र बंदचा परिणाम हरभरा दरावर

राज्यातील खरेदी केंद्र अचानक बंद झाली आहेत. खरेदी केंद्रावर प्रति क्विंटलला 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आला होता. या दराचा चांगलाच आधार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळत असतानाच केंद्राने अचानक निर्णय घेतल्याने मोठे नुकसान झाले आहे. 23 मे रोजीच केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 200 असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मालाची साठवणूक करावी का? असा सवाल उपस्थित होत आहे.

तुरीलाही हमीभावापेक्षा कमीच दर

खरीपातील तुरीची आवक सुरु झाल्यापासून दरात काही सुधारणाच झाली नाही. पावसामुळे तुरीचा दर्जा ढासळला होता. तर बाजारपेठेत उठावही पाहवयास मिळाला नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावर 6 हजार 300 दर ठरवून देण्यात आला होता तर आता बाजारपेठेत 6 हजार 100 रुपयांनी तुरीची खरेदी सुरु आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना गरज असताना एकाही शेतीमालाला अपेक्षित दर नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून उलट गरजेच्या वेळी कवडीमोल दरात विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला जात आहे.

Follow Us
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी