पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी या दरम्यान, शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांवर काही फवारणी करु नये. वातावरणातील बदलाप्रमाणे मोहरी पिकावर चापा किडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय अधिकच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली इमिडाक्लोपीड मिसळून फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 5:15 PM

मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही दिवसांनी पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम होणार आहेच पण शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून काही गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी या दरम्यान, शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांवर काही फवारणी करु नये. वातावरणातील बदलाप्रमाणे मोहरी पिकावर चापा किडीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शिवाय अधिकच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली इमिडाक्लोपीड मिसळून फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर हरभऱ्यावरील घाटीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे ते ही प्रति एकरी 8 लावणे गरजेचे आहे. जैविक नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे गरजेचे आहे.

भाजीपाल्याच्या लागवडीसाठी पोषक वातावरण

सध्या पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी त्यानंतर मात्र, भाजीपाला लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. भोपळ्याची लागवड करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. याकरिता बियाण्यांमध्ये लहान पॉलिथीन पिशव्या भरून शिफ्ट हाऊसमध्ये ठेवावे लागणार आहे. कोबी, फुलकोबी, कोबी इत्यादींच्या रोपणासाठी पोषक वातावरण आहे. या हंगामात पालक, कोथिंबीर, मेथीही पेरता येते. भाजीपाल्यांची जोमात वाढ होण्यासाठी आणि त्यांच्या पानांच्या वाढीसाठी एकरी 20 किलो युरिया एकरी फवारता येईल.

करपा रोगाचे नियंत्रण महत्वाचे

सध्याच्या वातावरणात बटाटा आणि टोमॅटो या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. विशेषत: करपा रोगामुळे या पिकाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बटाटा आणि टोमॅटोमधील करपा रोगावर सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. करपा रोगाची लक्षणे दिसताच कार्बांडीजम प्रति लिटर 1.o ग्रॅम किंवा डिथेन-एम-45.2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. कांद्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भानृव झाल्यास डेथेन-एम-45 फवारणी करणे योग्य आहे. वाटाण्याच्या पिकावर 2 टक्के युरिया सोल्यूशन फवारून घ्यावा लागणार आहे. ज्यामुळे वाटाण्याच्या शेंगांची संख्या वाढणार आहे. याप्रमाणे 29 डिसेंबरपर्यंत फवारणी केल्यास भाजीपाल्याला तसेच रब्बीतील पिकांनाही त्याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

हळदीचे क्षेत्र वाढूनही घटले उत्पादन, काय होणार दरावर परिणाम? वाचा सविस्तर

अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही….

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.