हळदीचे क्षेत्र वाढूनही घटले उत्पादन, काय होणार दरावर परिणाम? वाचा सविस्तर

मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये नाही पण परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. यंदाही अधिकच्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे या पिकावर करपा, कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढल्याने तब्बल 50 टक्के उत्पादनात घट झाली असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे.

हळदीचे क्षेत्र वाढूनही घटले उत्पादन, काय होणार दरावर परिणाम? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 3:55 PM

नांदेड : एकीकडे हळद हा शेतीमाल नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने आता त्यावर 5 टक्के जीएसटी लागू करण्यात येत आहे. तर दुसरीकडे यंदा लागवडीचे क्षेत्र वाढूनही (turmeric production) हळदीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. सर्व बाजूंनी शेतकऱ्यांच्या अ़डचणीमध्ये वाढच होत आहे. ( Marathwada) मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये नाही पण परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये (decline in production) हळदीचे उत्पादन घेतले जाते. यंदाही अधिकच्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे या पिकावर करपा, कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढल्याने तब्बल 50 टक्के उत्पादनात घट झाली असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. सर्वकाही असले तरी घटत्या उत्पादनामुळे मात्र, दर हे टिकून आहेत.

पुढील हंगामाचा परिणाम सध्याच्या दरावर

जानेवारी महिन्यात नवीन हळद ही बाजारात दाखल होणार आहे. मात्र, या पिकावर मध्यंतरीच्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. बदलत्या वातावरणामुळे हळदीवर करपा, कंदकुजी या रोगांचा प्रादुर्भाव हा झालेलाच आहे. त्यामुळे त्याच्या मालावरही परिणाम होणार आहे. आगामी हंगामातील हळद ही निकृष्ट असल्यानेच सध्या जी हळद बाजारात आहे तिचेच दर वाढताना पाहवयास मिळत आहे. सध्या हळदीला सरासरी 8 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे आगामी हंगामातील हळदीचा दर्जा लक्षात घेता दरामध्ये असा फरक होत आहे.

हळदीला एकरी 50 हजार रुपये खर्च

हळद हे काही मोजक्याच क्षेत्रात घेतले जाणारे पीक आहे. पण हळदीच्या गुणधर्मानुसार तिची वेगळी अशी ओळख आहे. हळदीची लागवड केल्यापासून ते काढणीपर्यंत 50 ते 60 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. बियाणे खरेदी, लागवड, खते, औषध फवारणी, मजुरी, काढणी आणि काढल्यानंतर पुन्हा शिजवून त्याची फिनिशिंग प्रक्रियेचा यामध्ये समावेश केला जातो. हा सर्व खर्च पाहता प्रति क्विंटल 8 ते 9 हजार रुपये दर मिळाला तरच हे पीक परवडते. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

उत्पादनात घट झाली तरी अपेक्षित दर मिळाला

वातावरणातील बदलामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. जवळपास 40 टक्के उत्पादनावर परिणाम झालेला आहे. दरवर्षी एकरी 12 ते 14 क्विंटलचे उत्पादन मिळत असते. पण यंदा घटलेल्या उत्पादनाची कसर ही वाढीव दराने भरुन काढलेली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर सध्या तरी मिळत आहे. शिवाय उद्या जानेवारी मध्ये नवीन हळदीचे दर काय राहणार यावरही बरेच अवलंबून आहे. पण हळदीचा दर्जा खालावल्याने काय परिणाम होतोय हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही….

वर्षभर कष्ट केलं तरीपण द्राक्ष निर्यातीचं स्वप्न भंगले, सांगा शेती करायची कशी ?

Video ! सक्तीची वीजबिल वसुली थांबवा ; मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचा रास्तारोको

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.