वर्षभर कष्ट केलं तरीपण द्राक्ष निर्यातीचं स्वप्न भंगले, सांगा शेती करायची कशी ?

वर्षभर कष्ट केलं तरीपण द्राक्ष निर्यातीचं स्वप्न भंगले, सांगा शेती करायची कशी ?
संग्रहीत छायाचित्र

आता द्राक्ष निर्यातीमधून मोठा लाभ मिळवायचा म्हणून सांगलीच्या एका शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष बाग जोपासली मात्र, ऐन तोडणीच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवघ्या काही दिवसांमध्येच होत्याचं नव्हतं झालं आहे. वातावरणातील बदलामुळे ‘डाऊनी मिल्ड्यू’चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने उद्यकुमार पाटील यांना द्राक्षांची तोडणी करुनच बांधावर फेकून देण्याची नामुष्की ओढावली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 27, 2021 | 2:41 PM

सांगली : उत्पादनवाढीसाठी शेती व्यवसयात उतरलेला शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. मात्र, बाजारपेठेतले सुत्र आणि निसर्गाचे चक्र याचा मेळ लागला तर अशक्य असे काहीच नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता (Vineyards) द्राक्ष निर्यातीमधून मोठा लाभ मिळवायचा म्हणून (Sangli) सांगलीच्या एका शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष बाग जोपासली मात्र, ऐन तोडणीच्या वेळीच (Untimely Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवघ्या काही दिवसांमध्येच होत्याचं नव्हतं झालं आहे. वातावरणातील बदलामुळे ‘डाऊनी मिल्ड्यू’चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने उद्यकुमार पाटील यांना द्राक्षांची तोडणी करुनच बांधावर फेकून देण्याची नामुष्की ओढावली आहे.

अवकाळीचा सर्वच पिकांना फटका

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाचा फटका प्रत्येक पिकाला बसलेला आहे. मात्र, सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे झाले आहे. आंब्याचा मोहर गळाला तर द्राक्ष बागांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. ‘डाऊनी मिल्ड्यू’मुळे द्राक्ष घड आणि पानांवर डाऊनीच्या प्रादुर्भावामुळे अनेक बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या आहेत. डाऊनीचे बाधित झालेली द्राक्ष घड तोडून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहिला नाहीत. परिणामी, कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत द्राक्ष उत्पादक शेतकरी असल्याचे चित्र दिसते आहे.

उर्वरीत बागा तरी जोपासायच्या कशा ?

पावसामुळे सांगली जिल्ह्यात सुमारे 20 टक्के बागांचे नुकसान झाले. उर्वरित बागा वाचविण्यासाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बागा साधल्या. द्राक्षपट्ट्यात फळ छाटणी घेऊन 96 दिवसांच्या पुढे बागा आहेत. मणी तयार झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे बागांमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. डाऊनीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणीसाठी दुप्पट खर्च देखील केला आहे. परंतु डाऊनीचा प्रादुर्भाव थांबला नाही. सुरुवातीला डाऊनी पानांवर आली. त्यानंतर हळूहळू त्याचा प्रसार मण्यांवर झाला असल्याने घडातून मणी खाली पडू लागले आहेत.

निर्यात सोडा झालेला खर्चही पाण्यातच

ज्या प्रमाणे मध्यंतरीच्या पावसामुळे पीक पाण्यात होती अगदी त्याप्रमाणेच केलेल्या खर्चाचे झाले आहे. अधिकच उत्पादन आणि द्राक्षांची निर्यात तर बाजूलाच राहिले पण आतापर्यंत उत्पादनावर झालेला खर्चही पदरी पडलेला नाही. यंदा तर द्राक्षाची निर्यात करुन उत्पन्नात वाढ करण्याचे ठरवले होते. पण आता डाऊनी मिल्ड्यूमुळे बागेतली द्राक्ष ही बांधावर फेकून देण्याची नामुष्की ओढावली असल्याचे सांगली जिल्ह्यातील वायफळे येथील उदयकुमार पाटील यांनी सांगतिले तर यंदा 25 लाखाचा फटकाही यामधून बसला असल्याचे ते म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

Video ! सक्तीची वीजबिल वसुली थांबवा ; मुंबई-आग्रा महामार्गावर भाजपचा रास्तारोको

मास्क नाही, तर भाजी नाही; ओमिक्रॉनची झळ थेट किचनपर्यंत, काय प्रकरण वाचा!

पुन्हा पावसाचे धोका : प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरच पिकांचे संरक्षण, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें