Milk Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, गायीच्या पाठोपाठ म्हशीच्या दूध दरातही वाढ, वाढत्या उन्हाचा काय परिणाम?

शेती उत्पादनात घट झाली असली तरी शेतीमालाचे वाढीव दर आणि आता शेतीचे जोड व्यवसाय शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये साथ देत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. याला महिनाही पूर्ण झाला नसाताना आता म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात झाली आहे.

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, गायीच्या पाठोपाठ म्हशीच्या दूध दरातही वाढ, वाढत्या उन्हाचा काय परिणाम?
गोव्यातही दूधाच्या दरात वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 12:04 PM

मुंबई : शेती उत्पादनात घट झाली असली तरी शेतीमालाचे वाढीव दर आणि आता शेतीचे जोड व्यवसाय शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये साथ देत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच सलग दोन वेळा (Cow Milk) गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. याला महिनाही पूर्ण झाला नसाताना आता  (Buffalo Milk) म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. (Gokul Milk) गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात झाली आहे. त्यामुळे म्हशीचे दूध आता थेट 64 रुपये लिटरप्रमाणे मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे म्हशीच्या दूध संकलनात झालेल्या घटीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. या दोन संघाने केलेल्या दर वाढीची अंमलबजावणी मुंबईसह उर्वरीत राज्यात देखील झाली आहे.

राज्याच्या राजधानीत 1 लाख 60 हजार दुधाचा खप

मुंबईत दिवसाकाठी 1 लाख 60 हजार वारणा दुधाचा खप होतो. यामध्ये 55 हजार लिटर दूध हे म्हशीचे तर उर्वरीत गायीचे असते. 31 मार्चपर्यंत म्हशीचे दूध 61 रुपये लिटर होते ते आता 1 एप्रिलपासून 64 रुपये लिटर झाले आहे. अनेक दिवसातून म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. तीन रुपयांनी झालेली वाढ ही शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी आहे. कारण आतापर्यंत केवळ पशूखाद्यांच्या दरातच वाढ होत होती.

वाढत्या उन्हामुळे दूध संकलनामध्ये घट

वाढत्या उन्हाचा परिणाम थेट दूध संकलनावरच होऊ लागला आहे. गोकुळचे रोजचे 60 ते 70 हजार लिटर दुधाचे संकलन हे घटले आहे. वाढत्या उन्हामुळे दरवर्षी अशी परस्थिती निर्माण होते. असे असले तरी मुंबईमध्ये दुधाची टंचाई ही भासणार नाही. कारण ज्याप्रमाणात दुधाचे संकलन हे घटले आहे तर दुसरीकडे सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक हे गावाकडे परतत असतात. त्यामुळे मागणीतही घट होणार असल्याचे गोकूळचे व्यवस्थापक दयानंद माने यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना फायदा काय?

दूध दरात 3 रुपयांची वाढ झाली असली तरी दोन महिन्यातून एकदा पशूखाद्याचे दर वाढत आहे. यंदा कापसापासून सरकी बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे टंचाई भासत असल्याने दरात वाढ झाली आहे. उत्पादनावरील खर्च हा वाढत आहे. शिवाय सध्या वाढत्या उन्हामुळे दूधही कमी झाले आहे. दुधाचे उत्पादन अधिक असते तर शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा झाला असता असे डेअरी चालक गणेश शेटे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Vineyard : उत्तर महाराष्ट्रात नुकसान तरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे धाडस, म्हणे उसापेक्षा द्राक्षाला गोडवा

Sindhudurg : अवकाळी मुळावर, सर्वकाही हिरावूनही अणखी दोन दिवस धोक्याचेच, आंबा उत्पादकांच्या आशा मावळल्या

Amravati: देर आए दुरुस्त आए, रब्बीच्या अंतिम टप्प्यात मिळाली खरिपाची नुकसानभरपाई

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.