विक्री केलेल्या कांद्याचे पैसे तातडीनं मागितले, व्यापाऱ्यांकडून तरुण शेतकऱ्याला बेदम मारहाण, संतप्त शेतकर्‍यांचा रस्ता रोको

येवला तालुक्यातील ममदापूर येथील कांदा उत्पादक तरुण शेतकरी अक्षय गुडघे या शेतकऱ्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या ट्रॅक्टर मधून 20-22 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता.

विक्री केलेल्या कांद्याचे पैसे तातडीनं मागितले, व्यापाऱ्यांकडून तरुण शेतकऱ्याला बेदम मारहाण, संतप्त शेतकर्‍यांचा रस्ता रोको
येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नाशिक: येवला तालुक्यातील ममदापूर येथील कांदा उत्पादक तरुण शेतकरी अक्षय गुडघे या शेतकऱ्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या ट्रॅक्टर मधून 20-22 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. अंदाजे 35 ते 40 हजार रुपये इतके कांदा विक्री नंतर पैसे मिळणार असल्याने शेती उपयोगी अवजारे घेण्यासाठी या रक्कमेचा वापर करण्याचा अक्षयचा मानस होता. या रकमेची अत्यंत गरज आहे त्यामुळे रोख स्वरूपात ही रक्कम आजच मिळावी , अशी मागणी अक्षय गुडघे यानं केली. शेतकऱ्याच्या या मागणीमुळे रागावलेल्या कांदा व्यापारी व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण सुरू केली. (Youth Farmer demanded money of onion urgent traders beat him farmers start protest at yeola)

अक्षय गुडघे जीव वाचवून पळाला

व्यापारी आणि कर्मचाऱ्यांच्या तावडीतून अक्षय गुडघे जीव वाचवत पळत येवला एसटी बस स्टँड समोर आला. यानंतर त्यानं शेतकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती समजताच नगर-मनमाड राज्यमार्गावर इतर शेतकऱ्यांच्या मदतीने या व्यापाऱ्यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

अर्धा तास रास्ता रोको

अचानक सुरू झालेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने येवला शहर पोलिसांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी या मुजोर कांदा व्यापार्‍यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी योग्य चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितल्यानंतर अर्धा तासाहून अधिक वेळ सुरु असलेला रस्ता रोको मागे घेण्यात आला.

24 तासाच्या आता पैसे देण्याच्या नियमाला हरताळ

बाजार समितीत शेतीमालाच्या लिलावानंतर 24 तासाच्या आत रोख स्वरूपात शेतीमालाची रक्कम अदा करणे हा नियम असतांनाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांना शेती मालाचे पैसे पंधरा दिवसांनी दिली जात असल्याचा हा शेतकरी आरोप करत आहेत. त्यामुळे व्यापारी कशा पध्दतीने बाजार समितीच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. मुजोर कांदा व्यापाऱ्यांचे परवाने चौकशी करून रद्द होणार का हा प्रश्न यानिमिताने उपस्थित केला जातो.

संबंधित बातम्या:

सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला

ऑटो मेकॅनिकची नोकरी सोडून शेतीचा निर्णय , आंब्याच्या बागेसह नर्सरीतून काकासाहेब सावंत यांची 50 लाखांची कमाई

(Youth Farmer demanded money of onion urgent traders beat him farmers start protest at Yeola)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI