2021 Volkswagen Tiguan बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, जाणून घ्या संभाव्य किंमत आणि फीचर्स

एक नवीन SUV कार भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये दाखल होणार आहे. ही एसयूव्ही अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असेल. या कारचे नाव आहे 2021 Volkswagen Tiguan.

2021 Volkswagen Tiguan बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, जाणून घ्या संभाव्य किंमत आणि फीचर्स
Volkswagen Tiguan

मुंबई : एक नवीन SUV कार भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये दाखल होणार आहे. ही एसयूव्ही अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असेल. या कारचे नाव आहे 2021 Volkswagen Tiguan. या नेक्स्ट जनरेशन एसयूव्ही कारमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या कारच्या इंजिन आणि एक्सटीरियरमध्ये बदल पाहायला मिळतील. यासोबतच इंटीरियरमध्येदेखील बदल करण्यात येणार आहेत. चला तर मग लाँचिंगपूर्वी या कारचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊया. (2021 Volkswagen Tiguan to launch tomorrow, know Price and expected features)

2021 Volkswagen Tiguan ही एक SUV कार आहे आणि हे कंपनीने थर्ड जनरेशन मॉडेल आहे. ही कार भारतात लाँच करण्यापूर्वीच जागतिक बाजारात दाखल झाली आहे. भारतात या कारचे लाँचिंग उद्या म्हणजेच 7 डिसेंबर रोजी होणार आहे. यासोबतच यात अनेक चांगले फीचर्स पाहायला मिळतील.

Volkswagen Tiguan 2021 मध्ये खास बदल

Volkswagen Tiguan जुन्या मॉडेलपेक्षा थोडी वेगळी असेल. लाँच नवीन फोक्सवॅगन टिगुआन एमक्यूव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, या प्लॅटफॉर्मवर फॉक्सवॅगन आधीपासूनच अनेक कार तयार करत आहे. या कारमधील बहुतांश बदल इंजिनाबाबतच करण्यात आले आहेत.

Volkswagen Tiguan 2021 चं इंजिन

फोक्सवॅगनच्या आगामी कारमध्ये 2.0 लीटर चार-सिलेंडर टर्बो पेट्रोल मोटर इंजिन मिळेल. यात 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि सेम स्टँडर्ड गिअरबॉक्सही मिळेल. हे इंजिन 190hp पॉवर जनरेट करू शकतं. तसेच, ते 320 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल, जे जुन्या TDI डिझेल इंजिन प्रमाणेच आहे, जे 40hp पॉवर आणि 340 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. या फोक्सवॅगन कारमध्ये कंपनीची MOTION all-wheel-drive सिस्टम असेल.

Volkswagen Tiguan 2021 मधील सेफ्टी फीचर्स

फॉक्सवॅगनच्या या कारमध्ये क्रूझ कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईएसपी, रीअर व्ह्यू कॅमेरा आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम यांसारखे अनेक सेफ्टी फीचर्स

Volkswagen Tiguan 2021 ची किंमत

Volkswagen Tiguan 2021 ची किंमत जवळपास 28 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. मात्र, कंपनीने अद्याप या किमतीबाबत अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. लॉन्च झाल्यानंतर ही कार Hyundai Tucson, Citroen C5 आणि Jeep Compass ला कारशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर


(2021 Volkswagen Tiguan to launch tomorrow, know Price and expected features)

Published On - 12:50 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI