नवी Volkswagen Polo बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

फोक्सवॅगनने (Volkswagen) कंपनी त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार ऑल न्यू पोलो (All New Polo) अपग्रेड करणार आहे.

नवी Volkswagen Polo बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
2022 Volkswagen Polo

मुंबई : फोक्सवॅगनने (Volkswagen) 2017 मध्ये ऑल न्यू पोलो (All New Polo) ही कार लाँच केली होती. आता कंपनी ही लोकप्रिय हॅचबॅक कार अपग्रेड करणार आहे. फोक्सवॅगन AG ने म्हटलंय की, त्यांनी आतापर्यंत जगभरात पोलोच्या 18 मिलियन युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने 45 वर्षांपूर्वी पहिली पोलो कार बनवली होती. दरम्यान, कंपनीने अपग्रेडेड पोलोचा जो नवीन टीझर लाँच केला आहे. त्यावरुन स्पष्ट होतंय की, नवीन फोक्सवॅगन पोलोमध्ये तुम्हाला वेगवेगळे बदल पाहायला मिळतील. (2022 Volkswagen Polo global going to launch on April 22, check Design, features)

या कारच्या डिझाइन थीमबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्याला या कारमध्ये नवीन एलईडी स्ट्रिप मिळू शकते, जी दोन्ही हेडलाइट्सना जोडली जाईल. VW लोगो देखील इल्यूमिनिटेड होईल. त्याच वेळी, डिझाइनर्सनी एलईडी हेडलाइट्समध्येदेखील बदल केला आहे. ही कार पर्पल पेंट स्कीममध्ये सादर केली जाऊ शकते. 22 एप्रिल 2021 ला ही कार भारतासह जगभरात लाँच केली जाईल. ही कार सर्वात आधी युरोपियन बाजारांमध्ये विक्रीसाठी सादर केली जाईल.

या कारबद्दल फारशी माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार फोक्सवॅगन कंपनी ही कार दोन इंजिन पर्यायांसह सादर करु शकते. यामध्ये पहिला पर्याय 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनाचा असेल तर दुसरा पर्याय सीएनजीचा असेल. कारच्या केबिनमध्ये काय बदल केले जातील, याबद्दल फारशी माहिती सादर करण्यात आलेली नाही. परंतु यात ग्राहकांना वायरलेस चार्जिंग, सनरूफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी मिळू शकते. लाँचिंगनंतर ही कार ह्युंदाय i20 ला जोरदार टक्कर देईल. करंट जनरेशन ग्लोबल पोलोमध्ये मोठी लेगरुम मिळणार नाही.

इंजिन

सध्या बाजारात जी फोक्सवॅगन पोलो उपलब्ध आहे, या कारमध्ये पेट्रोल इंजिनाचा पर्याय आहे. हे पेट्रोल इंजिन 999cc चं क्षमतेचं आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. पोलो कारचं मायलेज व्हेरिएंट आणि इंधन प्रकारानुसार 16.47 ते 18.24 किमी / ली इतकं आहे. पोलो 5 सीटर कार आहे. या कारची लांबी 3971 मिमी, रुंदी 1682 मिमी आणि व्हीलबेस 2470 मिमी इतका आहे.

इतर बातम्या

Volkswagen च्या ‘या’ शानदार SUV चं भारतात कमबॅक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tata Safari Vs Hyundai Alcazar; कोणती SUV अधिक दमदार, कोणाचे फीचर्स टॉप क्लास?

Nissan च्या ‘या’ कारला तुफान मागणी, उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा निर्णय, दर महिन्याला 3500 गाड्या बनवणार

(2022 Volkswagen Polo global going to launch on April 22, check Design, features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI