Tata Safari Vs Hyundai Alcazar; कोणती SUV अधिक दमदार, कोणाचे फीचर्स टॉप क्लास?

ह्युंदाय Alcazar एसयूव्ही भारतात थ्री रो SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. परंतु भारतीय बाजारात दाखल होताच या कारची टाटा सफारीसोबत (Tata Safari) स्पर्धा होणार आहे.

Tata Safari Vs Hyundai Alcazar; कोणती SUV अधिक दमदार, कोणाचे फीचर्स टॉप क्लास?
Tata Safari Vs Hyundai Alcazar
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 5:07 PM

मुंबई : ह्युंदाय Alcazar ही एसयूव्ही भारतात थ्री रो SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. कोरीयन कंपनीला त्यांच्या क्रेटा या कारनंतर आता Alcazar वर सर्वात जास्त विश्वास आहे. ही कार भारतात धुमाकूळ घालेल, असं कंपनीला वाटतं. परंतु ही कार भारतीय बाजारात दाखल होताच सर्वात आधी तिची टाटा सफारीसोबत (Tata Safari) स्पर्धा होईल. टाटाने अलीकडेच ही कार लाँच केली असून या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. परंतु सफारीला टक्कर देण्याची क्षमता ह्युंदायच्या Alcazar मध्ये आहे. (Tata Safari vs Hyundai Alcazar; Which SUV is better in specs and features)

ह्युंदाय Alcazar ही कार भारतात कधी लाँच केली जाईल, याबाबात कंपनीने अद्याप घोषणा केलेली नाही. मात्र काही लीक्सच्या माध्यमातून Alcazar चे फीचर्स समोर आले आहेत. तसेच कंपनीनेदेखील नुकताच काही फीचर्सचा खुलासा केला आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन थ्री रो एसयूव्हींबाबतची माहिती देणार आहोत. तसेच तुलनात्मकदृष्ट्या कोणती कार दमदार आहे, हेदेखील सांगणार आहोत.

कशी आहे टाटा सफारी?

Tata Motors कंपनीने फेब्रुवारी महिन्यात त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे. Tata Safari 2021 SUV ची सुरुवातीची किंमत 14.69 लाख रुपये (एक्स शो-रूम) इतकी ठेवण्यात आली आहे. या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 21.25 लाख रुपये इतकी आहे. टाटा मोटर्स कंपनीने काही आठवड्यांपूर्वी ही कार सादर केली होती. तसेच या कारचं बुकिंगदेखील सुरु करण्यात आलं आहे. कंपनीने नवीन टाटा सफारी 6 सीटर आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांसह लाँच केली आहे.

सहा व्हेरियंट्ससह सफारी दाखल

2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.

नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

कशी आहे ह्युंदाय Alcazar?

ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) आपली आगामी SUV Alcazar सादर केली आहे. कंपनीने या कारचे अधिकृत फोटो लीक केले आहेत. कोरियन कंपनी ही कार Tucson, क्रेटा आणि वेन्यू या कार्सच्या पोर्टफोलिओमध्ये सादर करत आहे. विशेष बाब म्हणजे Alcazar SUV ह्युंदाय इंडियाची पहिली थ्री रो सेगमेंटमधली कार असेल. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, डीलरशिप स्तरावर या एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. Alcazar भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मागील काही वर्षांपासून कंपनी क्रेटाच्या यशावर अवलंबून आहे. परंतु Alcazar च्या लाँचिंगनंतर ह्युंदाय भारतीय मार्केटमध्ये अधिक दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

क्रेटा प्रमाणे Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळतील ज्यात 3rd जनरेशन Nu 2 लीटर पेट्रोल आणि U2 1.5 लीटर डिझेल इंजिनाचा समावेश असेल. पेट्रोल इंजिन 159 PS पॉवर आणि 191 Nm टॉर्क देईल तर डिझेल युनिट 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देईल. अलीकडेच या एसयूव्हीची छायाचित्रे एका वेबसाइटने शेअर केली आहेत. लीक झालेल्या फोटोनुसार Alcazar एसयूव्हीचा पुढचा भाग सध्याच्या क्रेटापेक्षा अगदी वेगळा आहे. यात एक नवीन डिझाइन बम्पर आणि फ्रंट ग्रिल आहे, ही कार 5-सीटरच्या धर्तीवर सी-पिलर फ्रेमवर डिझाइन केली गेली आहे.

टाटा सफारीचे फीचर्स

1. LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स

टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.

2. चारही टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स

हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.

3. रूफ रेल्स

2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.

4. बॉस मोड

बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.

5. टिल्ट आणि टेलीस्कोपिक स्टियरिंग व्हील

2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.

6. रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स

सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.

7. सेफ्टी टच

2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.

8. दमदार इंजिन

या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.

ह्युंदाय अल्काझारचे फीचर्स

शानदार डिझाईन

आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

इतर बातम्या

Nissan च्या ‘या’ कारला तुफान मागणी, उत्पादन वाढवण्याचा कंपनीचा निर्णय, दर महिन्याला 3500 गाड्या बनवणार

मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर कार, किंमत 4 लाखांहून कमी, ‘या’ आहेत टॉप 4 कार्स

(Tata Safari vs Hyundai Alcazar; Which SUV is better in specs and features)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.