प्रतीक्षा संपली, Hyundai च्या अपकमिंग SUV Alcazar चे फीचर्स आणि फर्स्ट लुक सादर

प्रतीक्षा संपली, Hyundai च्या अपकमिंग SUV Alcazar चे फीचर्स आणि फर्स्ट लुक सादर
Hyundai Alcazar

भारतात आणखी एक मिड-साइज एसयूव्हीची एंट्री होणार आहे. Hyundai Motors कंपनी त्यांची बहुप्रतीक्षित Alcazar ही कार लाँच करणार आहे.

अक्षय चोरगे

| Edited By: Namrata Patil

Apr 09, 2021 | 6:55 AM

मुंबई : ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) आपली आगामी SUV Alcazar सादर केली आहे. कंपनीने या कारचे अधिकृत फोटो लीक केले आहेत. कोरियन कंपनी ही कार Tucson, क्रेटा आणि वेन्यू या कार्सच्या पोर्टफोलिओमध्ये सादर करत आहे. विशेष बाब म्हणजे Alcazar SUV ह्युंदाय इंडियाची पहिली थ्री रो सेगमेंटमधली कार असेल. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, डीलरशिप स्तरावर या एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. (Hyundai Alcazar look revealed, check Features and details)

Alcazar भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मागील काही वर्षांपासून कंपनी क्रेटाच्या यशावर अवलंबून आहे. परंतु Alcazar च्या लाँचिंगनंतर ह्युंदाय भारतीय मार्केटमध्ये अधिक दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रेटा प्रमाणे Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळतील ज्यात 3rd जनरेशन Nu 2 लीटर पेट्रोल आणि U2 1.5 लीटर डिझेल इंजिनाचा समावेश असेल. पेट्रोल इंजिन 159 PS पॉवर आणि 191 Nm टॉर्क देईल तर डिझेल युनिट 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देईल.

बुकिंग सुरु

नवीन Alcazar चे बुकिंग डिलरशिपवर सुरू झाले आहे, 50,000 रुपये देऊन तुम्ही ही कार बुक करु शकता. या कारचं बुकींग डीलरशिप आणि ऑनलाइन मोडद्वारे करता येईल. या कारचे वितरण जूनमध्ये सुरु केले जाईल, त्याप्रमाणे ह्युंदायने योजना आखली आहे. कंपनी ही कार 6 सीट्स आणि 7 सीट्स अशा दोन्ही लेआउट मध्ये सादर करु शकते. 6 सीटर व्हेरियंटच्या दुसर्‍या रांगेत कॅप्टन सीट दिली जाईल, तर 7 सीटर व्हेरियंटमध्ये बेंच सीट दिली जाईल. अलीकडेच या एसयूव्हीची छायाचित्रे एका वेबसाइटने शेअर केली आहेत. लीक झालेल्या फोटोनुसार Alcazar एसयूव्हीचा पुढचा भाग सध्याच्या क्रेटापेक्षा अगदी वेगळा आहे. यात एक नवीन डिझाइन बम्पर आणि फ्रंट ग्रिल आहे, ही कार 5-सीटरच्या धर्तीवर सी-पिलर फ्रेमवर डिझाइन केली गेली आहे.

ह्युंदाय मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) काही दिवसांपूर्वी या कारविषयी म्हटले होते की, कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या सात सीटर प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ग्राहक बिझनेस ट्रॅव्हल करत असेल अथवा कौटुंबिक सहलीवर असेल, तेव्हा ह्युंदाय अलकाझार ग्राहकांना गतिशीलता प्रदान करेल. HMIL ने म्हटले आहे की Alcazar लक्झरी डिझाईनकडून प्रेरित आहे, जे आकर्षक आणि प्रशस्त तसेच मजबुतीचं प्रतीक आहे. ही कार अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि टेक्नोसॅव्ही ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने त्यांच्या या आगामी उत्पादनाशी संबंधित अधिक माहिती दिलेली नाही.

शानदार डिझाईन

दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

इतर बातम्या

Tigor पासून Harrier पर्यंत, Tata ‘या’ गाड्यांवर 65000 रुपयांची सूट

Renault India चा जलवा, गाड्यांच्या विक्रीत तब्बल 278 टक्क्यांची वाढ

ही जबरदस्त कार 8 लाख रुपये सवलतीत उपलब्ध, कार विकत घेण्याची चांगली संधी

(Hyundai Alcazar look revealed, check Features and details)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें