Hyundai Alcazar साठी बुकिंग सुरु, ‘इतके’ रुपये भरुन शानदार SUV बुक करा

भारतात आणखी एक मिड-साइज एसयूव्हीची एंट्री होणार आहे. Hyundai Motors कंपनी त्यांची बहुप्रतीक्षित Alcazar ही कार लाँच करणार आहे.

Hyundai Alcazar साठी बुकिंग सुरु, ‘इतके’ रुपये भरुन शानदार SUV बुक करा
Hyundai Alcazar

मुंबई : भारतात आणखी एक मिड-साइज एसयूव्हीची एंट्री होणार आहे. ह्युंदाय मोटर (Hyundai Motors) कंपनी लवकरच त्यांची बहुप्रतीक्षित Hyundai Alcazar ही कार लाँच करणार आहे. कंपनीने नुकताच या कारचा एक टीझर रिलीज केला असून 6 एप्रिलला ही कार लाँच होणार आहे. या 7 सीटर एसयूव्हीची सर्वात खास बाब म्हणजे या कारचं ग्लोबल लाँचिंग भारतातून केलं जाणार आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, डीलरशिप स्तरावर या एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. (Hyundai Alcazar’s booking started at dealerships and Online Mode, check in how much Rs you can book SUV)

नवीन Alcazar चे बुकिंग डिलरशिपवर सुरू झाले आहे, 50,000 रुपये देऊन तुम्ही ही कार बुक करु शकता. या कारचं बुकींग डीलरशिप आणि ऑनलाइन मोडद्वारे करता येईल. या कारचे वितरण जूनमध्ये सुरु केले जाईल, त्याप्रमाणे ह्युंदायने योजना आखली आहे. कंपनी ही कार 6 सीट्स आणि 7 सीट्स अशा दोन्ही लेआउट मध्ये सादर करु शकते. 6 सीटर व्हेरियंटच्या दुसर्‍या रांगेत कॅप्टन सीट दिली जाईल, तर 7 सीटर व्हेरियंटमध्ये बेंच सीट दिली जाईल. अलीकडेच या एसयूव्हीची छायाचित्रे एका वेबसाइटने शेअर केली आहेत. लीक झालेल्या फोटोनुसार Alcazar एसयूव्हीचा पुढचा भाग सध्याच्या क्रेटापेक्षा अगदी वेगळा आहे. यात एक नवीन डिझाइन बम्पर आणि फ्रंट ग्रिल आहे, ही कार 5-सीटरच्या धर्तीवर सी-पिलर फ्रेमवर डिझाइन केली गेली आहे.

ह्युंदाय मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) काही दिवसांपूर्वी या कारविषयी म्हटले होते की, कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या सात सीटर प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ग्राहक बिझनेस ट्रॅव्हल करत असेल अथवा कौटुंबिक सहलीवर असेल, तेव्हा ह्युंदाय अलकाझार ग्राहकांना गतिशीलता प्रदान करेल. HMIL ने म्हटले आहे की Alcazar लक्झरी डिझाईनकडून प्रेरित आहे, जे आकर्षक आणि प्रशस्त तसेच मजबुतीचं प्रतीक आहे. ही कार अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि टेक्नोसॅव्ही ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने त्यांच्या या आगामी उत्पादनाशी संबंधित अधिक माहिती दिलेली नाही.

शानदार डिझाईन

दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

भारतात 3200 कोटींची गुंतवणूक

ह्युंदाय कंपनी भारतातला त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आणि कार लाँचिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी आता ग्रीन मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जेणेकरून लोकल ऑपरेशन्स मजबूत होऊ शकतील. कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ह्युंदाय आगामी काळात अनेक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहनांचादेखील समावेश आहे. दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात (पँसेंजर व्हीकल मार्केट) कंपनीचा एकूण 17 टक्के वाटा आहे.

इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एसएस किम म्हणाले की, भविष्यात चांगल्या वृद्धीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भविष्यात प्रॉडक्ट लाइनअपमध्ये अशा अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार असतील ज्या अतिशय कमी किंमतीत बनवल्या जातील. यासाठी कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

इतर बातम्या

2 रुपयात 5 किमी धावणार, ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल

(Hyundai Alcazar’s booking started at dealerships and Online Mode, check in how much Rs you can book SUV)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI