2023 Kawasaki Ninja ZX-10R : काय लूक… काय इंजिन… 16 लाखांत लॉन्च झाली ‘ही’ दमदार बाईक…

Kawasaki Ninja ZX-10R च्या नवीन मॉडेलला केवळ कॉस्मेटिक अपडेट्स देण्यात आले आहे. दुसरीकडे बाईकच्या इंजिन फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Kawasaki Ninja ZX-10R चे 2023 मॉडेल भारतीय बाजारात 15.99 लाख रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे.

2023 Kawasaki Ninja ZX-10R : काय लूक… काय इंजिन… 16 लाखांत लॉन्च झाली ‘ही’ दमदार बाईक…
Kawasaki Ninja 400 BS 6Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 7:19 PM

मुंबई : कावासाकी इंडियाने (Kawasaki India) कावासाकी निन्जा झेडएक्स-10आर 2023 (Kawasaki Ninja ZX-10R 2023) मॉडेल भारतात नुकतेच लॉन्च केले आहे. जपानी कंपनीची नवीन बाईक 15.99 लाख रुपयांच्या एक्सशोरूम किंमतीत बाजारात दाखल झाली आहे. लेटेस्ट बाइकमध्ये कंपनीकडून केवळ कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले असून याशिवाय कावासाकीने नवीन बाइकमध्ये लाइम ग्रीन आणि पर्ल रोबोटिक व्हाइट या दोन पेंट स्कीम आणले आहेत. याआधीही बाईकला लाइम ग्रीन पेंट स्कीम देण्यात येत होती. पण यावेळी कंपनीने ग्राफिक्स बदलले आहेत. नवीन मॉडेल मागील बाइकपेक्षा 85,000 रुपये अधिक महाग आहे. ZX-10R च्या इंजिन किंवा गिअरबॉक्समध्ये (Gearbox) कोणतेही बदल झालेले नाहीत.

इंजिन आणि राइडिंग मोड

Kawasaki Ninja ZX-10R पूर्वीप्रमाणेच 998 सीसी इन-लाइन चार सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिनने सज्ज राहिल. ही बाईक 6 स्पीड गिअरबॉक्स युनिटसह असून त्यामध्ये आरडब्ल्यूडी उपलब्ध आहे. नवीन बाइकमध्ये स्पोर्ट, रेन, रोड आणि रायडर मोड असे चार राइडिंग मोड आहेत. बाईक रायडर्स त्यांच्या आवडीनुसार रायडर मोड निवडू शकतात. यात क्रूझ कंट्रोल फीचर देखील आहे.

नवीन आकर्षक लूक

कावासाकी निन्जा ZX-10R भारतीय बाजारपेठेत सिंगल सीटसह सादर करण्यात आला आहे. ZX-10R डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बाईकचा लूक अधिक आकर्षक करते. नवीन बाईकमध्ये अतिरिक्त फीचर्स म्हणून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. कावासाकीने ZX-10R च्या डिझाइन आणि ग्राफिक्समध्ये बरेच बदल केले आहेत.

काय आहेत खास फीचर्स?

कावासाकी निन्जा ZX-10R ला सस्पेंशनसाठी 43 मिमी शोवाचे बीएफएफ फोर्क्स फ्रंट अप देण्यात आले आहेत. मागील बाजूस, शोवाचे BFRC लाइट शॉक अब्सॉर्बर मिळतात. नवीन बाइकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सारखे फीचर्स आहेत. भारतात अपकमिंग बाईक Honda CBR1000RR-R सारख्या बाइकशी स्पर्धा करते.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.