AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात ट्रकमध्ये वातानुकूलित केबिन या तारखेपासून अनिवार्य, केंद्रीय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

मोठ मोठे ट्रक हायवेवरून धावताना आपण पाहिले आहेत. पण हे ट्रक चालवताना ड्रायव्हर्सची चांगलीच दमछाक होते. वातानुकूतित केबिन नसल्याने अनेकदा ट्रक चालक अस्वस्थ होतात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. आता ट्रकच्या कामकाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पाऊल उचललं आहे.

भारतात ट्रकमध्ये वातानुकूलित केबिन या तारखेपासून अनिवार्य, केंद्रीय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
मोठ्या गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हर्संना मिळणार सुखद अनुभूती, या तारखेपासून एसी केबिन बंधनकारक
| Updated on: Dec 12, 2023 | 5:15 PM
Share

मुंबई : ट्रक चालवत लांब पल्ला गाठताना ड्रायव्हर्संची चांगलीच दमछाक होते. रस्त्याचा अंदाज आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पुरते बारा वाजतात. त्यात लांब पल्ल्याचा प्रवास करताना इंजिन चांगलंच तापतं आणि केबिनमध्ये बसलेल्या चालकांना गाडी चालवताना त्रास होतो. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचं ठरवलं होतं. ड्रायव्हर्सचा थकवा कमी करण्यासाटठी सर्व ट्रक वातानुकूलित करण्याचा विडा त्यांनी उचलला होता. त्यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश येईल असं म्हणायला हरकत नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत सांगितलं आहे की, “1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या एन२ आणि एन३ श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवली आहे. तसेच एअर कंडिशनिंग सिस्टम असलेल्या केबिनची चाचणी भारतीय मानक संस्थेच्या नियमानुसार असावी.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की, ‘भारतातील ट्रक ड्रायव्हर्स हा सार्वजनिक वाहतुकीतील सर्वाधिक दुर्लक्षित विभाग आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ट्रक चालक काम करत असतात. त्यांच्यावर देशातील जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्याची जबाबदारी असते. अनेकदा ठरलेल्या तासांपेक्षा जास्त काळ काम करतात. यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होते. यामुळे अनेकदा महामार्गावर रस्ते अपघात होऊ शकतात.’ एन2 कॅटेगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 3.5 टनाहून जास्त आणि 12 टनापेक्षा कमी असतं. तर एन3 कॅटगरी म्हणजे ज्या ट्रकचं वजन 12 टनापेक्षा अधिक असते.

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. “ट्रक चालकांचं काम आणि प्रवास सुखकर करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेलं. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. तसेच त्यांना लांबच्या पल्ल्यात थकवा जाणवणार नाही.” एसी केबिनमुळे व्यवसायिक वाहनांच्या किंमतीत वाढ होईल असं सांगण्यात आहे. या निर्णयावर काही जणांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या होत्या. पण याकडे आता सकारात्मक बदल म्हणून पाहणंही तितकंच गरजेचं आहे.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....