AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

All-new Mahindra Bolero लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या नव्या SUV मध्ये कोणते बदल होणार?

बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी चारचाकी गाडी आहे. तथापि, सध्या देशात बोलेरोशी स्पर्धा करु शकेल अशी कार उपलब्ध नाही.

All-new Mahindra Bolero लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या नव्या SUV मध्ये कोणते बदल होणार?
Bolero 2021
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 29, 2021 | 8:01 PM
Share

मुंबई : महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनीने नुकतीच पुष्टी केली आहे की, येत्या काही वर्षांत ते भारतीय बाजारात एक नवीन महिंद्रा बोलेरो (All-new Mahindra Bolero) लाँच करणार आहेत. (All-new Mahindra Bolero launching confirmed by officialls, check details(

आगामी बोलेरोची अधिकृत घोषणा शुक्रवारी ऑनलाईन मीडिया ब्रीफिंग दरम्यान करण्यात आली, यावेळी वित्त वर्ष 2021 साठी कंपनीच्या चौथा तिमाहीचा निकाल जाहीर केला जात होता. नवीन बोलेरो (New Bolero) व्यतिरिक्त, महिंद्रा कंपनी एक लांब, 5-डोर थार एसयूव्ही देखील लाँच करणार आहे. 2023 ते 2026 या कालावधीत दोन्ही मॉडेल्स लाँचसाठी सूचीबद्ध आहेत. दरम्यान, महिंद्राने अद्याप दोन्ही मॉडेल्सच्या लाँचिंगच्या तारीख जाहीर केलेली नाही.

कंपनीने याबाबत पुष्टी केली आहे की, नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल. या काळात कंपनी न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयूव्ही 300 आणि दोन नवीन मॉडेल्स लाँच करु शकतं. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.

Mahindra Bolero मध्ये काय असेल खास?

दमदार इंजिन

आपण यामधील आणखी काही डिझाईन्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन बोलेरो हेडलॅम्प्स, फॉग लाईट्स आणि बॉडी कलर ORVM’s मध्ये बदल केले जातील. अंडर द हुड नवीन महिंद्रा बोलेरो बीएस 6 कंप्लाएंट 1.5 लीटर, तीन सिलेंडर, mHawk डिझेल इंजिनसह येईल. यात 75bhp मॅक्झिमम पॉवर आणि पीक टॉर्क 210Nm इतकं असेल. त्याचबरोबर यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील दिले जाईल.

बाजारात वर्चस्व

बोलेरो ही भारतातील महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी चारचाकी गाडी आहे. तथापि, सध्या देशात बोलेरोशी स्पर्धा करु शकेल अशी दुसऱ्या कोणत्याही कंपनीची कार उपलब्ध नाही. त्यातल्या त्यात मारुती अर्टिंगा (Maruti Suzuki Ertiga) आणि रेनो ट्रायबर (Renault Triber) या दोन कार या विभागात मोडतात. परंतु त्यांची थेट बोलेरोशी स्पर्धा नाही.

नव्या बोलेरोची किंमत किती?

बोलेरोची किंमत 8.40 लाख ते 9.39 लाख रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत नवीन मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते, जी 8.50 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. 2021 मध्ये महिंद्रा अनेक उत्तम वाहनं लाँच करण्याचा सपाटा लावणार आहे. नवीन बोलेरो व्यतिरिक्त, या यादीत XUV700 समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, ग्राहक न्यू जनरेशन स्कॉर्पिओ, बोलेरो निओ आणि बर्‍याच इलेक्ट्रिक कार देखील लाँच करु शकते. तथापि, अद्याप या वाहनांचे पदार्पण कधी होणार याबाबतची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

प्रतीक्षा संपली! ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच होणार Mahindra XUV700, कशी असेल नवी SUV?

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु

(All-new Mahindra Bolero launching confirmed by officialls, check details(

Follow Us
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.