AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑगस्टमध्ये लाँच होणार ‘या’ धमाकेदार कार्स… काय असणार खास?

टोयोटा अर्बन क्रूजर भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. मारुतीच्या विटारामध्ये देण्यात आलेले सर्व फीचर्स व इंजिन सिस्टम या कारमध्येही दिसून येणार आहे. ही कार भारतात सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. मारुतीची ग्रेंड विटारा आणि टोयोटाची अपकमिंग अर्बन क्रूजरच्या एक्सटीरियरमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.

ऑगस्टमध्ये लाँच होणार ‘या’ धमाकेदार कार्स... काय असणार खास?
ह्युंदाई टकसनImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 30, 2022 | 11:05 AM
Share

ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्राचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये या क्षेत्रात अनेक उलाढाल होणार आहेत. या महिन्यामध्ये एक नव्हे तर तब्बल 9 कार लाँच होण्याची अपेक्षा आहे. या कार्समध्ये इलेक्ट्रिक कारसोबतच एक बजेट अल्टो कारदेखील (Alto car) दाखल होणार आहे; ही भारतातील सर्वात स्वस्त कार (Cheap car) असणार आहे. लाँचिंगच्या आधी या कार्सचे अनेक लिक्स समोर आले आहेत. या कार्सबद्दल ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सूकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या कार्सना कसा प्रतिसाद मिळतो, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या 9 कार्सपैकी चार कार्सची माहिती या लेखातून बघणार आहोत.

1) Electric Mahindra SUV

महिंद्राने नुकतेच आपली इलेक्ट्रिक कारचे टीझर जारी केले आहे. या टीझरमध्ये पाच अपकमिंग कार्सला दाखविण्यात आले आहे. या सर्वच इलेक्ट्रिक एसयुव्ही कार असण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजी या कार्सवरुन परदा उठविण्यात येणार आहे. या कार्समध्ये कुपे स्टाइलच्या कार्सपासून ते एक्सयुव्ही 700 कार्सपर्यंतची डिझाईन दिसून येत आहे. महिंद्रा एक्सयुव्ही 400 ची स्पर्धा नेक्सॉन ईव्हीशी होणार आहे.

2) 2022 Maruti Suzuki Alto Car

मारुतीची ही सर्वाधिक स्वस्त, एक बजेट कार आहे. या कारला 18 ऑगस्टला लाँच करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. या नवीन अल्टोबाबत अनेक माहिती समोर आली आहे. नवीन मॉडेल जुन्याच्या तुलनेत जास्त मोठे दिसून येणार आहे. ही एक न्यू जनरेशन हॅचबॅक कार असेल, यात अनेक नवीन लुक्स असलेले इंटीरिअर दिसून येणार आहे. यात फ्रंट बोनेटपासून ते रियरपर्यंत प्रत्येक पार्टमध्ये काही बदल दिसून येणार आहेत. ही सिलेरियोपेक्षा लहान व्हर्जन असणार आहे. नवीन अल्टोकारमध्ये 796 सीसीचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

3) New Toyota Urban Cruiser

टोयोटा अर्बन क्रूजर भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. मारुतीच्या विटारामध्ये देण्यात आलेले सर्व फीचर्स व इंजिन सिस्टम या कारमध्येही दिसून येणार आहे. ही कार भारतात सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. मारुतीची ग्रेंड विटारा आणि टोयोटाची अपकमिंग अर्बन क्रूजरच्या एक्सटीरियरमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.

4) Hyundai Tucson

ह्युंदाईने नुकतेच टकसन एसयुव्ही कारला लाँच केले आहे. लाँचिंगनंतर या कारने लोकांना आपल्याकडे आकर्षितही केले आहे. कंपनीने या कारला ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंगसाठीही खुले केले आहे. याचे बुकिंग अमाउंट कंपनीने 50 हजार रुपयांपर्यंत ठरविले आहे. या कारला कंपनीने स्पेशन डिझाईनमध्ये तयार केले आहे. यात ट्राइएंगुलर एलईडी डीआरएल हेडलाइट्‌स देण्यात आले आहे. त्याच सेाबत यात एलईडी स्ट्रिप्स देण्यात आली आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....