AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 7000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 4,099 रुपयांमध्ये, डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर जाणून घ्या

ज्या ग्राहकांकडे SBI कार्ड आहे, अशांना या अॅमेझॉन फॅब फोन फेस्टमध्ये खरेदीवर 10 टक्क्यांची इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये 7000 mAh बॅटरीसह Tecno Pova 3 वर अजून बर्याच सवलती देण्यात येत असून याबाबत या लेखात सविस्तर माहिती देणार आहोत.

तब्बल 7000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 4,099 रुपयांमध्ये, डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर जाणून घ्या
तब्बल 7000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 4,099 रुपयांमध्ये,Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 30, 2022 | 4:49 PM
Share

अॅमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स वेबसाइटवर फॅब फोन फेस्टचे (Fab Phone Fest) आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टचा फायदा घेउन ग्राहक कमीत कमी किमतीत स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजची खरेदी करू शकणार आहेत. ग्राहकांना विविध वस्तूंवर तब्बल 40 टक्के सूट दिली जाईल. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर (Exchange offer) देखील दिल्या जात आहेत. जर ग्राहकांकडे SBI कार्ड असेल तर अशांना 10 टक्क्यांपर्यंत तात्काळ सूट दिली जाईल. या सेलमध्ये 7000 mAh बॅटरीसह Tecno Pova 3 वर अजून बर्याच सवलती देण्यात येत आहेत. विविध स्मार्टफोनसह इतर इलेक्ट्रिक साहित्यांवरही चांगल्या सवलती देण्यात येत असल्याने ग्राहक या अॅमेझॉन फॅब फोन फेस्टचा जास्तीत जास्त लाभ घेताना दिसत आहेत.

Tecno Pova 3 किंमत

या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन 13 टक्के डिस्काउंटसह 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. दरम्यान, ज्या ग्राहकांना हा स्मार्टफोन ईएमआयवर खरेदी करायचा असेल त्या ग्राहकांना 612 रुपये प्रति महिना भरूनही हा स्मार्टफोन घरी आणता येईल. तसेच, जुन्या फोनची एक्सचेंज केल्यास, ग्राहकांना 8,900 रुपयांपर्यंतची ऑफर मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यावर, ग्राहक हा फोन 4,099 रुपयांना मिळवू शकता. ज्या ग्राहकांकडे SBI कार्ड असेल अशांना विविध आकर्षक डिस्काउंट तसेच कॅशबॅकची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

स्मार्टफोनमधील फीचर्स

फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.9 इंचाचा FHD+ डॉट इन डिसप्ले देण्यात आला आहे. फोनचा टच सॅम्पलिंग रेट 180 Hz आहे. हा फोन Octa core MediaTek Helio G88 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येते. फोनला 53 दिवसांच्या स्टँडबाय वेळेसह 7000mAh बॅटरीचा बॅकअप देण्यात आला आहे. यासोबत 33W फ्लॅश चार्ज सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 40 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते.

कॅमेरा फीचर्स

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेंसर, 2 मेगापिक्सेल डेप्थ सेंसर आणि AI लेंस देण्यात आला आहे. एक 8 मेगापिक्सेल फ्रंट सेंसर देखील आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.