AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harley Davidson : हार्ले डेव्हिडसनची इलेक्ट्रिक बाईक ‘या’ दिवशी होणार लाँच…

अमेरिकन इलेक्ट्रिक बाईक ब्रँड लाइववायर 10 मे रोजी livewire S2 Del Mar LE लाँच करणार आहे. कंपनीचे हे मॉडेल ऐरो ईव्ही आर्किटेक्चरवर आधारीत आहे. दरम्यान, अद्याप या बाइकच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किमतीबाबत कुठलीही माहिती लिक झालेली नसल्याने यासाठी ग्राहकांना 10 मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Harley Davidson : हार्ले डेव्हिडसनची इलेक्ट्रिक बाईक ‘या’ दिवशी होणार लाँच...
हार्लेच्या इलेक्ट्रीक बाईकची प्रतीक्षाImage Credit source: instagram
| Updated on: May 06, 2022 | 1:33 PM
Share

हार्ले डेव्हिडसन (Harley Davidson) लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक (Electric bikes) बाजारात दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहे. कंपनी आपले इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्रँड लाइववायरअंतर्गत लाइववायर एस2 डेल मार एलई (livewire S2 Del Mar LE) मॉडेल लाँच करणार आहे. ही एक मिडिलवेट इलेक्ट्रिक बाईक असणार आहे. लाइववायरचे अपकमिंग मॉडेल संपूर्णपणे नवीन मॉड्यूलर ऐरो ईव्ही आर्किटेक्चरसोबत ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. एस2 डेल मार, लाइववायर वन मॉडलच्या नंतर मिडिलवेट इलेक्ट्रिक बाइकच्या रांगेत दुसरे मॉडेल आहे. हे मॉडेल कंपनीच्या ऐरो प्लेटफार्मवर विकसित करण्यात आले आहे. ज्यात सिंगल युनिटमध्ये एक बॅटरी पॅक, इलेक्ट्रोनिक्स आणि मोटरचादेखील सहभाग असणार आहे. कंपनीची ही लेटेस्ट बाइक 10 मे रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

S2 व्हर्जनसह येणार भेटीला

कंपनी डेल मार बाईक S2 व्हर्जन प्लेटफॉर्मसोबत ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. हा प्लेटफॉर्म मिडिलवेट मोटरसायकलसाठी विकसित करण्यात आला आहे.

याशिवाय कंपनी लाइटवेट बाइकसाठी S3 आणि S4 व्हर्जन हेवीवेट मॉडलसाठी याचा वापर करण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिन्ही व्हर्जन ऐरो ईव्ही आर्किटेक्चरवर आधारीत आहेत. आगामी मॉडल हार्ले डेविडसनच्या 2019 वरील फ्यूचर मिडिलवेट बाईकच्या इलेस्ट्रेशनवर आधारीत असू शकते.

लिमिटेड एडिशन असण्याची शक्यता

लाइववायर एस 2 डेल मार एलई बाइकच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे मॉडेल पेट्रोल बेस्ड 700 सीसी पॉवर सोबत उपलब्ध होउ शकते. याच्या नावाच्या शेवटी असलेल्या एलईचा अर्थ लिमिटेड एडिशन असाही होउ शकतो.

एका रिपोर्टनुसार, या मॉडेलची कदाचित 100 युनिटच मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होउ शकतात. याच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स, किंमतबाबतची माहिती 10 मे रोजीच मिळू शकते. दरम्यान, गेल्या वर्षी हार्ले डेविडसनने स्पेशन एक्विजिशन कंपनी AEA-ब्रिजेस इंपॅक्ट कार्पोरेशन आणि ताइवानच्या स्कूटर निर्माता किमको सोबत लाइववायरच्या विलयची घोषणा केली होती. अशात आता हार्ले डेविडसन या दोन्ही कंपन्यांसोबत आपल्या इलेक्ट्रिक बाइक ब्रँडचे मर्जर लवकरच करु शकते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.