Video : पलटी झालेली जीप पुन्हा वेगाने धावली, आनंद महिंद्रा म्हणाले “तुम्ही असा प्रयत्न करू नका”

Video : पलटी झालेली जीप पुन्हा वेगाने धावली, आनंद महिंद्रा म्हणाले तुम्ही असा प्रयत्न करू नका
पलटी झालेली जीप पुन्हा वेगाने धावली
Image Credit source: twitter

आनंद महिंद्रा यांनीही या व्हिडिओसोबत एक उत्तम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की शब्दकोशातील 'ऑन अ रोल'ची व्याख्या चांगली प्रगती करणे असा आहे. तसेच ती प्रगती टिकली पाहिजे. व्हिडीओतील कार पाहून मला तसंच वाटतंय.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 14, 2022 | 2:20 PM

नवी दिल्ली – महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अनेकदा ट्विटरवर व्हिडीओ (Twitter Video) शेअर करतात. तसेच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकदा लोकांच्यामध्ये चर्चा सुरू होते. त्यांचा एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आला की, लोकांना पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. काही क्षणात तो व्हिडीओ व्हायरल होतो. शुक्रवारी एक जीप (Jeep) पलटी झालेला व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत असलेली जीप तीनवेळा पलटी झाल्यानंतर थेट धावू लागली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना कमेंटमधून प्रश्न विचारले आहेत.

जीपची ताकद प्रचंड आहे

आनंद महिंद्रा यांनीही या व्हिडिओसोबत एक उत्तम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की शब्दकोशातील ‘ऑन अ रोल’ची व्याख्या चांगली प्रगती करणे असा आहे. तसेच ती प्रगती टिकली पाहिजे. व्हिडीओतील कार पाहून मला तसंच वाटतंय. हा व्हिडिओ बहुतेक दक्षिण भारतातील रॅली दरम्यानचा आहे. जीपची ताकद पाहून मला नक्कीच आश्चर्य वाटले आहे. परंतु मी कोणालाही तशा पध्दतीचं कृत्य करा असं म्हणणार नाही. संबंधित ट्विटमधील व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

त्या व्हिडीओत काय आहे

या व्हिडिओमध्ये जी जीप दिसत आहे, ती महिंद्राच्या मेजरसारखीच सेम टू सेम दिसत आहे. महिंद्रा मेजर ही कंपनीच्या विलीस जीपची कॉपी होती. महिंद्राने 1949 मध्ये विलीस जीपची विक्री सुरू केली.

हे सुद्धा वाचा

त्या गाडीला आज नवी टेक्नॉलॉजी देऊन महिंद्रा थार बनवली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें