AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple इलेक्ट्रिक कारची पहिली झलक, समोर आलेल्या फोटोने अनेकांना लावलं वेड

मार्केटमध्ये बहुचर्चित Apple इलेक्ट्रिक कारची ग्राहकांपासून सगळे वाट पाहत आहे. Apple कंपनी गेल्या महिन्यांपासून इलेक्ट्रिक कारवर काम करत आहेत. ही कार दिसायला कशी असेल, मार्केट मध्ये ती कधी येणार यांची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच वानरमा नावाच्या कार लीजिंग कंपनीने Apple इलेक्ट्रिक कारचे रेंडर तयार केलं आहे. या रेंडरींग पाहून कारच्या संभाव्य डिझाइनचा अंदाज येतो. चला आपण पण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक कार बद्दल

Apple इलेक्ट्रिक कारची पहिली झलक, समोर आलेल्या फोटोने अनेकांना लावलं वेड
Apple Electric Car
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 5:12 PM
Share

मुंबई : दिवसेंदिवस इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) भडका त्यापाठोपाठ सीएनजीच्या किमतीतही वाढ त्यामुळे कार चालवणे कठिण होत चाललं आहे. त्यात आता लोकांचा कल इलेक्ट्रिक कारकडे (Electric Car) वळतोय. मार्केट मध्ये अजून इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यात Apple कंपनी इलेक्ट्रिक कार वर काम करत असल्याचं समोर आलं. आणि मग चर्चा सुरू झाली नेमकी ही कार असेल कशी? तर याचं उत्तर वनरामाने देण्याचा प्रयत्न केला आहे.

या कंपनीने Apple इलेक्ट्रिक कार कशी असेल याचं रेंडर तयार केलं आहे. आणि ते रेंडर वनरामाने ऑनलाईन प्रसिद्ध केलं आहे. या रेंडरद्वारे Apple इलेक्ट्रिक कार कशी असेल यांचा अंदाज येतो. हे डिझाईन्स Apple बनवत असलेल्या कारचा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्षात ही कार वेगळी असू शकते. वनराम या कंपनीने Apple ने आजपर्यंत तयार केलेल्या कारच्या डिझाइन चा अभ्यास करून इलेक्ट्रिक कारचं अंदाजे डिझाइन शेअर केलं आहे.

ही कार दिसायला कशी?

पहिल्या नजरेत ही कार एकदम स्टायलिश दिसत आहे. कारच्या इतर लूकचा विचार केला तर कारचे पार्ट्स एकदम स्मूथ दिसत आहेत. तर या कारची संपूर्ण बॉडी एकच पॅनेल आहे. चित्रांमध्ये मोठी चाके, मागे घेता येण्याजोग्या दरवाजाचे हँडल आणि दाराचे खांब दिसत नाहीत. कारच्या डोरबद्दल बोलायचं झालं तर ते रिट्रैक्टेबल डोर हैंडल्स या डिझाइन मध्ये दिसतात.

Apple Electric Car

Apple Electric Car

आतून कशी आहे ही कार?

डिझायरने ज्या शानसोबत बाहेरुन कार आकर्षित बनवली आहे. त्यापेक्षा जास्त मेहनत आतील कारच्या डिझाईनवर काम केलं आहे. ही कार Apple च्या इतर कार बद्दल केलेल्या अभ्यासानंतर डिझाइन केली आहे. मात्र कारच्या आतील डिझाइनवर डिझायनची कल्पनाशक्ती दिसतेय. गाडीमध्ये पेडल्स, स्लीक आणि स्मार्ट गियरसोबत आकर्षित असं चौकोनी स्टिअरिंग आहे. तर डिडॅशबोर्डवरील डिस्प्ले सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. या स्मार्ट डिडॅशबोर्डमध्ये स्पीडोमीटर, कारचे डिटेल्स, मॅप, म्यूझिक, अॅप्स आणि सिरी तुम्ही पाहू शकतात. या कारमध्ये चार फिरणाऱ्या सीट असून त्या सेल्फ ड्राइव्हच्या वेळी उपयोग येतील. सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत कार बद्दल जी माहिती सांगण्यात आली आहे, त्याबद्दल अॅपल कंपनी कडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

2025 मध्ये कार मार्केटमध्ये येण्याची शक्यता

कारच्या लॉन्च बद्दल Apple कंपनीकडून कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र तिचे ज्या प्रमाणात पायलट तयार होत आहे. त्या अंदाजावरून Appleची ही ‘प्रोजेक्ट टायटन’ कार 2025 साली येण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला; भाई जगतापांनी सांगितलं वेगळं कारण\

केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्नात, मात्र एक दिवस NIAला खरं सांगावंच लागेल, मलिकांचा आरोप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.