Apple ची इलेक्ट्रिक कार कधी लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स

ब्लूमबर्ग न्यूजने, काही सूत्रांचा हवाला देत एक अहवाल सादर केला आहे की, Apple Inc. आपली इलेक्ट्रिक कार 2025 च्या सुरुवातीला लॉन्च करण्याचा विचार करत आहे. फुल ऑटो-ड्रायव्हिंग केपॅबिलिटीसह प्रकल्प पुन्हा सुरू करण्यावर कंपनी जोर देत आहे.

Apple ची इलेक्ट्रिक कार कधी लाँच होणार? जाणून घ्या डिटेल्स
Apple Electric Car
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:00 PM

मुंबई : ब्लूमबर्ग न्यूजने, काही सूत्रांचा हवाला देत एक अहवाल सादर केला आहे की, Apple Inc. आपली इलेक्ट्रिक कार 2025 च्या सुरुवातीला लॉन्च करण्याचा विचार करत आहे. फुल ऑटो-ड्रायव्हिंग केपॅबिलिटीसह प्रकल्प पुन्हा सुरू करण्यावर कंपनी जोर देत आहे. विशेष म्हणजे या रिपोर्टनंतर आयफोन निर्मात्या कंपनीचे शेअर्स जवळपास 3% वाढले आहेत. (Apple electric car can launch in 2025, Know details here)

अॅपलच्या आयडॉल इलेक्ट्रिक कारमध्ये स्टीयरिंग व्हील आणि पेडल्स नसतील, ही कार इंटर्नली हँड्स-ऑफ ड्रायव्हिंगसाठी डिझाईन केली आहे. कंपनीचा हा ऑटोमोटिव्ह प्रोजेक्ट टायटन म्हणून ओळखला जाईल. 2014 पासून या प्रकल्पावर काम केले जात आहे, कंपनीने प्रथम स्केचेसद्वारे वाहन डिझाइन करण्यास सुरुवात केली आहे.

रॉयटर्सने अहवाल दिला होता की, Apple 2024 ला एक प्रवासी वाहन (Apple Passenger Vehicle) तयार करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, अधिसूचनेत एका मेमोचा हवाला देण्यात आला आहे की, Apple 1 फेब्रुवारीपासून कर्मचार्‍यांना कार्यालयात परत आणण्याची तयारी करत आहे आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी चार आठवडे घरुन काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची परवानगी देईल.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी अशी बातमी आली होती की, आयफोन निर्माती कंपनी फायनल पार्ट सप्लायर्स निवडत आहे. यापूर्वी, टेक दिग्गज कंपनीने जॉइंट डेव्हलपमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट प्रोडक्शन कराराबाबतची माहिती घेण्यासाठी बीएमडब्ल्यू, ह्युंडई, निसान आणि टोयोटाशी संपर्क साधला होता. अ‍ॅपल जागतिक ऑटोमोबाईल पार्ट उत्पादकांना रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन (आरएफआय), रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) आणि रिक्वेस्ट फॉर कोटेशन (आरएफक्यू) पाठवण्याच्या प्रक्रियेतून गेली आहे.

अ‍ॅपलने अलीकडेच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, स्टीयरिंग, डायनॅमिक्स, सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव असलेल्या दोन माजी मर्सिडीज अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. हे अभियंते आता Apple च्या स्पेशल प्रोजेक्ट्स ग्रुपमध्ये प्रोडक्ट डिझाईन इंजिनीअर म्हणून काम करत आहेत, ज्यांना Apple कारसाठी नियुक्त केले आहे.

कारची बॅटरी असेल खास

अ‍ॅपलची ही कार बॅटरी असलेली कार असेल, अ‍ॅपल ही बॅटरी मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अ‍ॅपल कंपनी कारच्या बॅटरीसाठी मोनो सेल्स वापरेल. डिझाइनसाठी उत्कृष्ट साहित्य वापरले जाईल. या बॅटरीची खास गोष्ट अशी असेल की, ती तुम्हाला मोठ्या रेंजसाठी सपोर्ट करेल. अ‍ॅपलच्या सूत्रांनी हे उघड केले आहे की, ही नेक्स्ट लेव्हल बॅटरी असेल.

अ‍ॅपल यासाठी Lidar सेन्सर्स वापरेल, जे तुम्हाला रस्त्याचे 3D व्ह्यू देतील. 2017 मध्ये, Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक Apple च्या ऑटोनमस ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरबद्दल बोलले होते. हे असे तंत्रज्ञान आहे ज्याला मदर ऑफ ऑल AI प्रोजेक्ट्स म्हटले जात आहे.

इतर बातम्या

या तीन गाड्यांना मिळालं सर्वात खराब सेफ्टी रेटिंग, क्रॅश टेस्टमध्ये फेल

अपकमिंग सुझुकी ऑल्टोचे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

सुझुकीची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, किंमत…

(Apple electric car can launch in 2025, Know details here)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.