Auto Expo 2025 : छोटा पॅकेट बडा धमाका; Vinfast Car ने येताच गाजवले मार्केट, इतर कंपन्या बसल्या हात चोळत
Auto Expo 2025 Vinfast smaller car : व्हिएतनामची जगविख्यात कंपनी विनफास्टने ऑटो एक्स्पोमध्ये मार्केट गाजवले. अगदी दहा वर्षे उणेपुऱ्या असणार्या विनग्रुपने बाजारात हातपाय पसरले आहे. ही कंपनी वर्ष 2017 मध्ये बाजारात आली होती.

ऑटो एक्सपो 2025 मध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, हुंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या नामचीन कंपन्यांचा जलवा दिसून येतो. तर किआ, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, एमजी मोटर्स, बीवाईडी या कंपन्यांनी पण दबदबा तयार केला आहे. यामध्ये व्हिएतनामच्या जगविख्यात कंपनी विनफास्टने ऑटो एक्स्पोमध्ये मार्केट गाजवले. अगदी दहा वर्षे उणेपुऱ्या असणार्या विनग्रुपने बाजारात हातपाय पसरले आहे. ही कंपनी वर्ष 2017 मध्ये बाजारात आली होती. या कंपनीने पहिल्याच दिवशी ऑटो एक्स्पोमध्ये 3 कार उतरवल्या आहेत. ही कंपनी बाजारात नवखी असली तरी तिने बाजार गाजवला आहे.
व्हिएतनामची कंपनी ऑटो एक्स्पोत
व्हिएतनामची विनफास्ट पहिल्यांदाच ऑटो एक्स्पोत उतरली आहे. या कंपनीची स्थापना विनग्रुपने 2017 मध्ये केली होती. ही कंपनी जागतिक बाजारात हातपाय पसरत आहे. इलेक्ट्रिक कारसोबतच ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी तयार करते. या कंपनीची नोंद आता अमेरिकन शेअर बाजारात करण्यात आली आहे. या कारचे युनिक डिझाईन आणि गुणवत्ता सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे ही कंपनी लवकरच तामिळनाडूत उत्पादन सुरू करणार आहे.




कंपनीचे मार्केट कॅप किती?
ही कंपनी अमेरिकन शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. विनफास्टचे सध्याचे मार्केट कॅप 9.63 अब्ज डॉलर म्हणजे 83,378 कोटी रुपये आहे. तर मारुती सुझुकीचे मार्केट कॅप 3.81 लाख कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स मार्केट कॅप 2.87 लाख कोटी रुपये आहे. महिंद्रा अँड महिंद्रा मार्केट कॅप 3.63 लाख करोड रुपये आहे. हुंदई मोटर्स इंडियाचे मार्केट कॅप1.45 लाख कोटी रुपये आहे. विनफास्टपेक्षा या इतर कंपन्यांचे मार्केट कॅप दुप्पट आहे.
तीन कार बाजारात
विनफास्टने ऑटो एक्सपोमध्ये एका दमात तीन कार सादर केल्या. Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये विनफास्ट ने VinFast VF 6 सादर केली. ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयुव्ही आहे. VinFast VF 3 ही एक छोटी इलेक्ट्रिक कार आहे. यामध्ये 4 जणांची बसण्याची व्यवस्था आहे. ही कार यावर्षाअखेर बाजारात दाखल होईल. तर तिसरे मॉडेल VinFast VF 7 आहे.