Ducatis Electric Bike: डुकाटीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइक V21L बाबत मोठा खुलासा, वेगावर व्हा स्वार, 275kmph ची टॉप स्पीड

Ducatis upcoming Bike: डुकाटीची अपकमिंग बाइक एका दमदार बॅटरीसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार,याची टॉप स्पीड 275kmph असणार आहे. तसेच बॅटरीला चार्ज करण्यासाठी थंड करण्याचीही गरज पडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. बाइकचे एकूण वजन 225kg असून यात, केवळ बॅटरीचे वजन 110kg आहे.

Ducatis Electric Bike: डुकाटीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइक V21L बाबत मोठा खुलासा, वेगावर व्हा स्वार, 275kmph ची टॉप स्पीड
स्पर्धा वा-याशी डुगाटी
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jul 04, 2022 | 4:08 PM

डुकाटीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइकशी निगडीत माहितींचा खुलासा केला आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाइक डुकाटी व्ही21एल (Ducati V21L) लवकरच बाईकप्रेमींच्या भेटाला येणार आहे.पुढील वर्षी होत असलेल्या FIM MotoE वर्ल्ड कपमध्ये आपल्याला धावताना दिसणार आहे. या आधी 2019 मध्ये मोटोईच्या सुरवतीपासूनच इटलीच्या इलेक्ट्रिक बाइक(Electric bike) निर्माता Energica बाइक सप्लाय करत होती. परंतु 2023 पासून डुकाटी V21L इलेक्ट्रिक बाइकच्या सोबत या जबाबदारीला सांभाळणार आहे. अपकमिंग बाइक एका दमदार बॅटरीसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याची टॉप स्पीड (Top speed) 275kmph असणार आहे. तसेच बॅटरीला चार्ज करण्यासाठी थंड करण्याचीही गरज पडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.बाइकचे एकूण वजन 225kg असून यात, केवळ बॅटरीचे वजन 110kg आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी बाइकची टेलमध्ये एक इंटिग्रेटेड 20kw चार्जिंग सॉकेट मिळणार आहे.

दमदार बॅटरी पॅकने सुसज्ज

कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनामध्ये सोबत देण्यात आलेली बॅटरी ही एक महत्वाची भूमिका बजावत असते. डुकाटीची पहिली इलेक्ट्रिक बाइकमध्ये युजर्सला 18kWh चे मोठे बॅटरी पॅकचा सपोर्ट मिळत आहे. बाइकचे एकूण वजन 225kg असून यात, केवळ बॅटरीचे वजन 110kg आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी बाइकची टेलमध्ये एक इंटिग्रेटेड 20kw चार्जिंग सॉकेट मिळणार आहे.

बॅटरी होणार झटपट चार्ज

डुकाटीच्या दाव्यानुसार, इलेक्ट्रिक बाइकचा कुलिंग सिस्टीम एक डबल सर्किट डिझाईन असून ज्याचा बॅटरी पॅक आणि इन्व्हर्टर युनिटची थर्मल गरजांना पूर्ण करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत. डुकाटीचा असाही दावा आहे, की चार्जिंग सुरु करण्यासाठी बॅटरी पॅकला थंड होण्यापर्यंची वाट बघण्याची गरज नाही. ही इलेक्ट्रिक बाईक केवळ 45 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्ज होउ शकते. त्यामुळे बाईकवर भटकंती करणा-या तरुणाईला एकाच ठिकाणी जास्त वेळ बसण्याची गरज राहणार नाही. अवघ्या 40-45 मिनिटांच्या विसाव्यात ही बाईक पुढचे अंतर कापायला सज्ज असेल.  त्यामुळे ही बाईक तरुणाईच्या पसंतीला उतरेल असा विश्वास कंपनीला वाटतो.

हे सुद्धा वाचा

इतकी मिळेल रेंज

डुकाटीने सध्या इलेक्ट्रिक बाइकच्या रेंजचा खुलासा केलेला नाही. परंतु FIM MotoE रेसच्या माध्यमातून या अपकमिंग बाइकच्या रेंजचा काहीसा अंदाज लावता येउ शकतो. साधारणत: FIM MotoE रेस 35 किमी लांब असते. या सारखे अंतर पार करण्यासाठी 110 किलोचे बॅटरी पॅकवरुन सहज अंदाज लावता येईल की  ही बाइक मार्केटमध्ये आल्यावर किती रेंज मिळवू शकेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें