कोणत्या कारला काळ्या नंबर प्लेट्स असतात? त्याचा अर्थ काय? जाणून घ्या

Black Number Plate: तुमच्यापैकी अनेकांनी ब्लॅक नंबर प्लेट पाहिली असेल. पण, ही नंबर प्लेट लावण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर केला जातो, हे बहुतांश लोकांना माहित नसते. सहसा काळ्या नंबर प्लेटच्या गाड्या भाड्याच्या गाड्या असतात. हे केवळ लक्झरी हॉटेलद्वारे चालवले जाते, ज्यासाठी व्यावसायिक परवान्याची आवश्यकता नसते. याविषयी अधिक जाणून घ्या.

कोणत्या कारला काळ्या नंबर प्लेट्स असतात? त्याचा अर्थ काय? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 10:20 PM

Black Number Plate: तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेट अनेकदा वेगवेगळ्या रंगाच्या असतात, काही लोकांना वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेटचे कारण माहित असते पण बहुतेकांना त्याचा अर्थ माहित नसतो. हे रंग वाहनाचा प्रकार आणि त्याचा वापर दर्शवितात. अशातच आज आम्ही तुम्हाला ब्लॅक नंबर प्लेटबद्दल सांगणार आहोत. याविषयी तुम्ही सविस्तर माहिती पुढे जाणून घ्या.

काळ्या नंबर प्लेटचा अर्थ काय?

सहसा काळ्या नंबर प्लेटच्या गाड्या भाड्याच्या गाड्या असतात. हे केवळ लक्झरी हॉटेलद्वारे चालवले जाते, ज्यासाठी व्यावसायिक परवान्याची आवश्यकता नसते.

काळी नंबर प्लेट कशासाठी?

हे सुद्धा वाचा

ओळख: काळ्या नंबर प्लेटमुळे वाहन भाड्याने घेतले आहे की नाही हे पाहणे सोपे जाते.

व्यावसायिक परवाना: अशा वाहनांसाठी व्यावसायिक परवान्याची आवश्यकता नसते.

इतर रंगांच्या नंबर प्लेट्स आणि त्यांचा अर्थ काय आहे, हे देखील जाणून घ्या.

नंबर प्लेट्सचे रंग आणि त्याचे अर्थ

पांढरी: खाजगी वाहने

पिवळी: व्यावसायिक वाहने (टॅक्सी, ऑटो, बस इ.)

लाल: तात्पुरती नंबर प्लेट, नवीन वाहने

निळी: सरकारी वाहने

हिरवी: इलेक्ट्रिक वाहने

काही राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर विशिष्ट प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्लेट असू शकतात. नंबर प्लेटचा रंग आणि अर्थ काळानुसार बदलू शकतो. आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या परिसरातील आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

‘हे’ देखील वाचा

वाहतूक करताना वाहतुकीचे नियम देखील माहिती असायला हवे. ट्रॅफिक लाईटबद्दल देखील पुढे जाणून घ्या.

भारतातील ट्रॅफिक लाईट्स

काळाच्या ओघात ट्रॅफिक लाईटमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यात नवे फीचर्स जोडण्यात आले होते. आजच्या काळात ट्रॅफिक लाईट वेगवेगळे संकेत देतात. भारतात ट्रॅफिक लाइट्सचा वापर विसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाला. सध्या भारतातील जवळपास सर्वच शहरांमध्ये ट्रॅफिक लाईटचा वापर केला जातो. त्यात या ट्रॅफिक लाईटचा कोणी उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला याचा दंड भरावा लागतो. यात देखील आता अनेक बदल झाले आहे. पहिले ट्रॅफिक पोलीस हवालदार गाडी थांबवून चालान कट करायचे मात्र आता डिजिटल माध्यमातून ट्रॅफिक सिग्नलच्या वर कॅमेरे लावण्यात आले ज्याने ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास त्या गाडीचा ऑनलाईन पद्धतीने चालान कट केला जातो.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार.