BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त…

बीएमडब्लू (BMW) सेडान 2 सिरीज ग्रॅन कूप लाँच करण्यात आली आहे. या शानदार कारची किंमत 39.3 लाख रुपयांपासून सुरु होते.

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 8:58 PM

मुंबई : बीएमडब्लू (BMW) सेडान 2 सिरीज ग्रॅन कूप लाँच करण्यात आली आहे. या शानदार कारची किंमत 39.3 लाख रुपयांपासून सुरु होते. त्यामुळे ही सर्वात स्वस्त सेडान ठरली आहे. ही BMW 2 सिरीज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या इंजिनासह उपलब्ध होणार आहे. सध्या ही सिरीज 220 डी व्हेरिएंटसह समोर आणली आहे. पेट्रोल 220 आय व्हेरिएंट लवकरच लाँच होणार आहे. (BMW Launches Affordable Sedan in india)

ही बीएमडब्ल्यूची पहिली अशी सेडान आहे ज्यात चार दरवाजे देण्यात आले आहेत. 4-डोअर कूपप्रमाणे या कारची बॉडीस्टाईल डिजाईन करण्यात आली आहे. ही सेडान स्टॉर्म बॉय (ग्रे), स्नॅपर रॉक्स (टीले / अॅक्व्हा), मिस्नो ब्लूसह सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. सेडान 2 सिरीज ही यूकेएल फ्रंट व्हील ड्राइव्ह मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे.

सेडान-2 सिरीज ग्रॅन कूपमध्ये डबल बॅरल एलईडी डिटेलिंग वाली रेक-बॅक हेडलाईट असल्यामुळे या कारला वेगळा लुक मिळतो. एल शेपमधील एलईडी टेललाईट्सदेखील या गाडीचा रुबाब वाढवतात.

सेफ्टीच्या बाबतीतही ही कार जबरदस्त आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग, आयसोफिक्स चाईल्ड सीट माऊंट, 3-पॉईंट सीटबेल्ट, एबीएस किंवा अँटी लॉक ब्रेक, स्टेबिलिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आलं आहे. यासोबतच रनफ्लॅट टायर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंगसह अन्य स्पेसिफिकेशनचाही समावेश करण्यात आला आहे.

नव्या सेडानमध्ये 220 डी सोबत 2.0 लीटरचं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, हे इंजिन 190 बीएचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क निर्माण करतं. या इंजिनामुळे ही कार 7.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकते. कंपनीने कारचे इंजिन 8-स्पीड स्टेप-ट्रॉनिक ट्रान्समिशनसह तयार केलं आहे.

संबंधित बातम्या

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ पाच कार बघाच!

होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, किंमत फक्त…

BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित

(BMW Launches Affordable Sedan in india)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.