AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! 11 लाखांची Honda City अवघ्या 1.41 लाखात

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 11 लाखांची Honda City अवघ्या 1.41 लाखात
Honda City (PS- OLX)
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 06, 2021 | 3:49 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Honda City in just rs 141000, know more about it)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

परवडणारी किंमत, मायलेज आणि फीचर्समुळे होंडा सिटी (Honda City) ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. या कारची किंमत 10.99 लाखांपासून सुरू होते आणि 14.94 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येते. परंतु आपण ही कार सेकंड हँड कार मार्केटमधून (Second Hand Car Market) खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही कार ओएलएक्स (OLX) या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. एकंदरीत, ही एक शानदार डील आहे.

अवघ्या 1.41 लाखात खरेदी करा Honda City

ही फर्स्ट ऑनरशिप कार असून पश्चिम बंगालच्या क्रमांकावर नोंदवलेली आहे. कारचे मेकिंग ईयर 2007 आहे आणि ती फक्त 1,41,000 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. वेबसाईटवर ही कार चौमाथा चकदाह परिसरात उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कशी आहे कार?

वेबसाइटवर दिलेल्या तपशीलांनुसार ही कार केवळ 48,250 किमी चालली आहे. हे कारचं ZX EXi मॉडेल (मॅन्युअल ट्रांसमिशनसह) आहे. ही एक पेट्रोल कार आहे. कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 1498 cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. मायलेज 17.8 ते 24.1 च्या दरम्यान आहे. या कारचं इंजिन 97.89 ते 119.35bhp पॉवर जनरेट करतं. कारचा इन्श्योरन्स (2021 पर्यंत) पेड आहे. कारच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार कार चांगल्या स्थितीत आहे. कारचं इंजिन उत्तम आहे. ही कार चांगल्या प्रकारे मेन्टेन करण्यात आली आहे.

सध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 1,41,000 रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.

इतर बातम्या

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

(bumper offer buy Honda City in just rs 141000, know more about it)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ