AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 42 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger 220

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 42 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger 220
Bajaj Avenger 220 (प्रातिनिधिक फोटो)
| Updated on: May 17, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Avenger 220 bike in just Rs 42000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 42 हजारात Bajaj Avenger 220 बाईक

CredR वर तुम्हाला केवळ 42,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Avenger 220 बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 220cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Bangalore-Bellandur/Bajaj-Avenger-220/17989) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक बंगळुरुमध्ये उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 20,000 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

Bajaj Avenger 220 चे फीचर्स

Bajaj Avenger 220 या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल सिलिंडर ट्विन्सपार्क ऑइल कूल्ड इंजिन मिळेल ज्यामध्ये फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह कॅटालिटिक कन्व्हर्टर देखील आहे, जे 7508rpm वर 18.7bhp आणि 7000rpm वर 17.5nm पीक टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त, या बाईकच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस अॅडजस्टेबल ट्विन स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आलं आहे. सोबतच या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल चॅनल एबीएस सिस्टिम देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 1,45,930 रुपये इतकी आहे.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

हेही वाचा

आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.