अवघ्या 26 हजारात घरी न्या Bajaj Pulsar 150, बाईक पसंत न पडल्यास पैसे परत

पल्सर 150 ला तिच्या डिझाइनसाठी प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही आज शोरूममध्ये हे वाहन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 1.15 लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागेल.

अवघ्या 26 हजारात घरी न्या Bajaj Pulsar 150, बाईक पसंत न पडल्यास पैसे परत
Pulsar 150

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल बाईक आणि स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. Bajaj Pulsar 150 असे या बाईकचे नाव आहे. (buy Bajaj Pulsar 150 in just rs 26000, will get 1 year warranty too)

पल्सर 150 ला तिच्या डिझाइनसाठी प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही आज शोरूममध्ये हे वाहन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 1.15 लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. परंतु आज आम्ही घेऊन आलेल्या ऑफरच्या मदतीने तुम्ही हे वाहन कमी किंमतीत घरी आणू शकता. ही ऑफर प्राईस 26 हजार रुपये इतकी आहे. होय, आपण ही बाईक केवळ 26000 रुपयांत खरेदी करु शकता.

बाईकच्या फीचर्सविषयी बोलायचे झाले तर तुम्हाला यात 149.5cc सिंगल सिलिंडर इंजिन मिळते जे 13.80bhp पॉवर आणि 13.40Nm पीक टॉर्क देते. तुम्हाला बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. जर आपण ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोललो तर तुम्हाला 240Nm डिस्क ब्रेक आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक मिळेल. याशिवाय, तुम्हाला ट्यूबलेस टायर्स देखील मिळतात.

या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी दावा करते की, ही बाईक 65 किमी / लीटर इतकं मायलेज देते. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, CARS24 ही वेबसाईट जी सेकंड हँड वाहने खरेदी करते आणि विकते, या कंपनीच्या साइटवर ही पल्सर 150 सूचीबद्ध केली आहे. त्यावर या बाईकची किंमत 26 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बाईकचे मॉडेल 2009 चे आहे. ही फर्स्ट ओनर बाईक आहे. ही बाईक आतापर्यंत 65,134 किलोमीटर धावली आहे. बाईकची नोंदणी दिल्लीच्या DL-06 RTO ची आहे. आपल्याला या बाईकच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी आणि 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीसह मिळते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(buy Bajaj Pulsar 150 in just rs 26000, will get 1 year warranty too)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI