AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Start | लगेच होणार कार स्टार्ट, हिवाळ्यात करा की हा उपाय

Car Start | हिवाळ्याची चाहुल लागली आहे. हिवाळ्यात कार आणि बाईक सुरु होण्यात मोठी अडचण येते. कार-बाईक काही केल्या दाद देत नाहीत. सकाळी तर माणूस घामाघूम होतो, पण कार आणि बाईक काही केल्या सुरु होत नाही. पेट्रोल-डिझेल दोन्ही कार लगेच स्टार्ट होत नाही. सर्वात जास्त समस्या डिझेल कारमध्ये येते.

Car Start | लगेच होणार कार स्टार्ट, हिवाळ्यात करा की हा उपाय
| Updated on: Oct 21, 2023 | 7:15 PM
Share

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : आता हिवाळ्याची चाहुल लागली आहे. थोड्याच दिवसात अंगावर स्वेटर दिसायला सुरुवात होईल. सकाळी आणि संध्याकाळी बोचरी थंडी त्रास देईल तर गुलाबी थंडीने मजा येईल. पण सर्वात जास्त समस्या येते ती बाहेर फिरणाऱ्यांसाठी. सकाळी मुलांना शाळेत घेऊन जायचे असते आणि नेमकी चारचाकी काही सुरु होत नाही. काही कामासाठी सकाळीच बाहेर पडायचे असते, अशावेळी कार सुरु करण्यासाठी त्रास होतो. जास्त करुन डिझेल कारबाबत (Car Maintenance In Winter) हा त्रास जाणवतो. पेट्रोल कारविषयी पण हीच समस्या दिसते. हा समस्या दूर करण्यासाठी मॅकेनिकडे जाण्यापूर्वी या टिप्स वापरुन बघा.

हिवाळ्यातच का येते समस्या

  • हिवाळ्यात इंजिन ऑईल घट्ट होते. त्यामुळे इंजिनच्या पिस्टनला सिलेंडरमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे स्टार्टर मोटरवर मोठा दबाव येतो.
  • थंडीमुळे बॅटरीची क्षमता कमी होते. त्यामुळे स्टार्टर मोटरला कधी कधी आवश्यक करंट मिळत नाही. त्यामुळे कार झटपट स्टार्ट होत नाही.
  • थंडीमुळे इंधनाचा पुरवठा लवकर होत नाही. त्यामुळे इंजिन सुरु करण्यासाटी जास्त वेळ लागतो. ही सम्या पेट्रोल कारमुळे डिझेल कारमध्ये अधिक येते.

मग करुन पहा हा उपाय

  1. कारची बॅटरी एकदा तपासून पहा. बॅटरीची चार्जिंग लेव्हल नेहमी 12.6 व्होल्टपेक्षा अधिक असावी. त्यामुळे हिवाळ सुरु होण्यापूर्वीच बॅटरीचे काम लवकरात लवकर उरकून घ्या. बॅटरीतील पाणी, बॅटरी जुनी झाली का ते तपासा
  2. हिवाळ्यात कार उघड्यावर पार्क करु नका. थंडीचा परिणाम कारचे इंजिन आणि बॅटरीवर होतो. कारला शेडमध्ये पार्क करा अथवा त्यावर अच्छादन टाकणे हितकारक ठरु शकेल.
  3. जर कार स्टार्ट होत नसेल तर तर दुसऱ्या कारची बॅटरी वा कारचे जंक्शनचा वापर करा. त्यामुळे कारच्या स्टार्टर मोटरला लागलीच करंट मिळेल.
  4. स्टार्ट नादुरुस्त तर नाही ना, हे पण तपासा. कारचे इंजिन गरम करण्यासाठी उपाय करा.
  5. कारच्या रेडिएटरमध्ये Coolent आणि पाणी यांचे 50/50 टक्के मिश्रण आहे.
  6. सिंथेटिक-ब्लेंड इंजिन ऑईल कमी तापमानात चांगले प्रवाहित होतात. त्यामुळे थंडीत कार सुरु करण्यासाठी अडचण येत नाही. त्यामुळे कारचे ऑईल बदलणे गरजेचे असते.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.