Citroen C5 Aircross SUV महागली, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू

Citroen C5 Aircross Price Hike in India : Citroen India ने मंगळवारी C5 Aircross SUV या देशातील एकमेव एसयूव्हीच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे.

Citroen C5 Aircross SUV महागली, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू
Citroen C5 Aircross SUV
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 6:00 AM

Citroen C5 Aircross Price Hike in India : Citroen India ने मंगळवारी C5 Aircross SUV या देशातील एकमेव एसयूव्हीच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. कंपनीने अलीकडेच एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, त्यांची C5 Aircross SUV भारतात 1 जानेवारी 2022 पासून महाग होईल. फ्रेंच कार निर्मात्याने सांगितले की, त्यांच्या C5 Aircross SUV च्या नवीन किमतीतील वाढ ही कारच्या सध्याच्या एक्स-शोरूम किमतींपेक्षा 3% पर्यंत असेल. ही कार देशभरात Feel आणि Shine अशा दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते. कमोडिटीच्या किमतीत सातत्याने दरवाढ होत आहे आणि वाढत्या शिपिंग खर्चामुळे कंपनीला कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. (Citroen C5 Aircross prices to be hiked by 3percent from Jan 2022)

C5 Aircross SUV ची किंमत वाढवण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही, कारण याआधी नोव्हेंबरमध्ये कंपनीने आपल्या कारची किंमत 1 लाख रुपयाने वाढवली होती. सध्या, SUV च्या फील व्हेरियंटची किंमत 31.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि शाईन व्हेरियंटची किंमत 32.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही किमती जानेवारी 2022 पासून 3 टक्क्यांनी वाढतील.

कशी आहे C5 Aircross?

सिट्रॉन C5 Aircross मध्ये कंपनीने 2 लीटर डिझेल इंजिन दिले आहे, जे 175 bhp मॅक्सिमम पॉवर आणि 400 Nm पीक टॉर्क निर्माण करु शकतं. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. यामध्ये फ्रंट व्हील ड्राइव्ह ऑप्शन आहे पण यात मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळत नाही. ही एसयूव्ही 18.6 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. कारची लांबी 4500 मिलीमीटर, रुंदी 2099 मिलीमीटर आणि उंची 1710 मिलीमीटर आहे. तर, व्हीलबेस 2730 मिलीमीटर इतका आहे.

Citroen C5 Aircross च्या फ्रंट आणि रिअर दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक असून या एसयूव्हीमध्ये 52.5 लीटर क्षमतेचा पेट्रोल फ्यूल टँक देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यामध्ये 6 एअरबॅग्स, ESP, हिल डीसेंट कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट इन्फॉर्मेशन सिस्टिम (BLIS) मिळेल. याशिवाय इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, फ्रंट अँड रियर पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा, ISOFIX माउंट्स, ऑटोडुअर अनलॉक असे अनेक सेफ्टी फीचर्स मिळतात.

Citroen C3 SUV लवकरच भारतात लाँच होणार

दरम्यान, Citroen भारतात आपले दुसरे मॉडेल सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, ते लवकरच C3 SUV लाँच करतील. ही कार भारतीय बाजारात निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट कायगरला टक्कर देईल. देशातील सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांचा रस वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये आपापली वाहने लाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

(Citroen C5 Aircross prices to be hiked by 3percent from Jan 2022)

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.