ओला S1 Pro ची फ्री टेस्ट ड्राइव्ह घेतली का? अशी करा स्टेप बाय स्टेप बुकिंग

ओला S1 Pro ची फ्री टेस्ट ड्राइव्ह घेतली का? अशी करा स्टेप बाय स्टेप बुकिंग
Ola s1 pro

इलेक्ट्रिक स्कूटर तीन सेकंदाच्या एक्सीलेशनसह 115 किमी प्रतीतासाची स्पीड पकडण्यास सक्षम आहे. ही स्कूटर 8.5 Kw सोबत उपलब्ध आहे. ज्या माध्यमातून जवळपास 135 Kms ची रेंज मिळेल.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 25, 2022 | 11:52 AM

1 लाख 39 हजार 999 रुपये किंमत आलेली ओला एस1 प्रो (Ola S1 Pro) इलेक्ट्रिक स्कूटर आता देशभरात बुकिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बेंगलुरुमधील कंपनीचे सीईओ भाविष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी स्कूटर खरेदी केल्यानंतर अगदी 24 तासांमध्ये त्यांना स्कूटरची डिलिव्हरी मिळणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric scooter) तीन सेकंदाच्या एक्सीलेशनसह 115 किमी प्रतीतासाची स्पीड पकडण्यास सक्षम आहे. ही स्कूटर 8.5 Kw सोबत उपलब्ध आहे. ज्या माध्यमातून जवळपास 135 Kms ची रेंज मिळेल. दरम्यान, ही गाडी विकत घेण्याआधी कंपनीकडून देशातील सर्व ग्राहकांसाठी एक फ्री टेस्ट ड्राईव्हदेखील (free test drive) ऑफर केली आहे. स्कूटरच्या बुकिंगची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

टेस्ट राईड एलिजिबिलिटी

ज्या लोकांना ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे, त्यांच्या जवळ व्हॅलिड ड्राईव्हिंग लायसेंस असणे आवश्‍यक आहे. सोबत त्यांचे वय 18 वर्षांहून अधिक असणे आवश्‍यक राहणार आहे.

अशी बुक करा टेस्ट राईड

युजर्स ओला इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईड ओला ॲपच्या माध्यमातून बुक करु शकणार आहेत. किंवा सरळ वेबसाइटच्या माध्यमातूनही बुकिंग करणे शक्य होणार आहे. ॲपच्या माध्यमातून बुकिंग करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो कराव्यात :

1) आपल्या मोबाईलमधून ओला ॲप उघडावे, आणि टेस्ट राईड ओला एस1 प्रो. Book Now वर क्लिक करावे.

2) आता तूम्हाला टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध असलेली दिल्ली, बेंगलुरु, चेन्नई, मुंबई आणि प्योर अशी चार शहर दिसतील.

3) तुमच्या सोयीस्कर लोकेशनला सिलेक्ट करा, शहरात तीन ते चार पिकअप पाईंट असतील, त्यातील एक निवडा.

4) आपल्या सोयीची वेळ निवडा, आता आपले नाव, फोन नंबर, आणि ईमेल आईडीची माहिती भरावी.

5) आपली राईड सुनिश्‍चित करावी.

हे सुद्धा वाचा

ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस1 आणि एस1 प्रो नावाचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. एस1 मध्ये 2.98kWh ची बॅटरी असून त्याचे वजन 121kg आहे. S1 व्हेरिएंट 3.6 सेकंडमध्ये 0-40 किमी/तास अशी स्पीड पकडण्यास सक्षम आहे. आणि 90 किमी/तासाची टॉप स्पीड मिळवू शकते. या स्कूटरचा दावा करण्यात आलेली रेंज 121 किमी इतकी आहे. यात नॉर्मल आणि स्पोर्ट्‌स ड्राईव्हिंग मोड मिळणार आहेत. तसेच एस1 प्रो मध्ये 3.97 kWh ची बॅटरी असून तिचे वजन 125 केजी आहे. एस1 प्रो 3  सेकंदात 0-40 किमीची स्पीड पकडू शकते. स्कूटरचा टॉप स्पीड 115m/h इतका आहे. ही स्कूटर 181 किमीची रेंज मिळवू शकते.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें