KUV 100, XUV 500 आणि Scorpio सह महिंद्राच्या गाड्यांवर 3.06 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने BS-6 कंप्लायंट वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर केली आहे.

KUV 100, XUV 500 आणि Scorpio सह महिंद्राच्या गाड्यांवर 3.06 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
Mahindra-Scorpio
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 8:34 AM

मुंबई : नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने BS-6 कंप्लायंट वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरी माहितीनुसार ऑटोमेकर आपल्या संपूर्ण मॉडेल रेंजवर 3.06 लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. सूट जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांच्या यादीत नवीन महिंद्रा थारचा समावेश करण्यात आलेला नाही. ग्राहकांना यामध्ये रोख ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. यात KUV 100 NXT, Alturas G4 फ्लॅगशिपचा समावेश आहे. या सवलतीच्या ऑफरचा लाभ 30 एप्रिल 2021 पर्यंत मिळू शकेल. (Discount up to Rs 3.06 on Mahindra cars including KUV 100, XUV 500 and Scorpio)

महिंद्रा KUV100 NXT अधिकृत वेबसाइटवर 62,055 रुपयांच्या फायद्यांसह सूचीबद्ध करण्यात आली आहे. यात 38,055 रुपयांची रोख सूटही मिळणार आहे, तर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा यामध्ये समावेश आहे. या दरम्यान ग्राहकांना 4000 रुपयांची कॉर्पोरेट सूटदेखील मिळू शकते. तर XUV300 सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीवर एकूण 44,500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. या एसयूव्हीवर ग्राहकांना 10,000 रुपयांची रोख सूट मिळू शकते. तसेच 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4500 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.

Alturas G4 वर 3.06 लाखांची ऑफर

भारतीय युटिलिटी निर्माता कंपनी Alturas G4 SUV एसयूव्हीवर एकूण 3.06 लाख रुपयांचा लाभ देत आहे. यात 2.20 लाख रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 50,000 रुपयांपर्यंतची सूट समाविष्ट आहे. या एसयूव्हीवरही इतर फायदे उपलब्ध आहेत. ग्राहक Marazzo MPV 41,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करु शकतात. यामध्ये 20.000 रुपयांची रोख सवलत, त्यानंतर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत देण्यात आली आहे.

ऑफरमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओचाही समावेश

दुसरीकडे, या ऑफरमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओवर एकूण फायदा 36,542 रुपयांचे लाभ देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 7042 रुपयांचा रोख बोनस, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस तसेच 4500 आणि 10,000 रुपयांचे अतिरिक्त लाभ देण्यात आले आहेत. महिंद्रा XUV500 वर 36,800 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 25000 रुपयांचा बोनस, 9000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 15000 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

महिंद्रा बोलेरोवरही सूट

ऑफरमध्ये समाविष्ट करण्यात आलेली शेवटची कार म्हणजे बोलेरो. या कारवर एकूण 17,500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये 3500 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

बंपर ऑफर : Renault KWID ते Tata Nexon, या 8 गाड्यांवर 85,800 रुपयांपर्यंतची सूट

देशातील 5 सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक हॅचबॅक कार्स, 23KMPL मायलेज, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

(Discount up to Rs 3.06 on Mahindra cars including KUV 100, XUV 500 and Scorpio)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.