AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इलेक्ट्रिक बसेससह पुनर्विकसित माहीम बसस्थानक मुंबईकरांच्या सेवेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रिक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

इलेक्ट्रिक बसेससह पुनर्विकसित माहीम बसस्थानक मुंबईकरांच्या सेवेत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 7:26 PM
Share

मुंबई : कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रिक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (Electric buses and redeveloped Mahim bus stand inaugurated by CM Uddhav thackeray)

बेस्टच्या 74 व्या वर्धापनदिनी पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, FAME II प्रकल्पातंर्गत 12 मीटर्स लांबीच्या इलेक्ट्रिक बसगाड्या, नविन वातानुकुलित बस मार्ग क्र.ए-115 आणि ए-116 तसेच 24 इतर गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माहिम पश्चिम बसस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रकल्प पी.वेलारासू, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलिंद वैद्य, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 1874 ते 2021 हा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. इलेक्ट्रिक बस प्रदूषण न करणारी व पर्यावरण पूरक बस आहे. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाने बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन करण्यात येत आहे.

कोरोना काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले. काहींचे मृत्यू झाले. तरीदेखील बेस्ट थांबली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे बेस्टचे आधुनिकीकरण शक्य होत आहे. यापुढे ई पास सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असून एकाच तिकीटावर अनेक सुविधा मिळणार आहेत.

गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करत आहोत. कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालक भेटून गेले. त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. कोरोना उलटणार तर नाही ना हेही पहावे लागणार आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी इलेक्ट्रिक बसच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली. नविन इलेक्ट्रनिक धोरणानुसार 15 टक्के इलेक्ट्रॉनिक व्हेइकल वाढवण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थापनाविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ॲप विकसित करण्यात येणार आहे, असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.

सेवानिवृत्त एक हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे प्रदान

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वितरणाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उपदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या 1005 कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी लागणारी रुपये 94.21 कोटी एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(Electric buses and redeveloped Mahim bus stand inaugurated by CM Uddhav thackeray)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.