AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EV Range Tips : अशाप्रकारे वाढू शकते इलेक्ट्रीक कारची रेंज, या टिप्स ठेवा ध्यानात

इलेक्ट्रीक वाहानांमध्ये बॅटरीची रेंज (EV Range Tips) हा मुख्य मुद्दा असतो. काही गोष्टींची काळजी घेतल्यास  तुमच्या कारची रेंज थोड्या प्रमाणात वाढू शकते. चला तर मग तर जाणून घेऊया अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या इलेक्ट्रीक कारची रेंज वाढवू शकाल.

EV Range Tips : अशाप्रकारे वाढू शकते इलेक्ट्रीक कारची रेंज, या टिप्स ठेवा ध्यानात
इलेक्ट्रीक कारImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 31, 2023 | 4:44 PM
Share

मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सातत्याने वाढत आहे. अनेक मोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या कार महत्त्वाच्या आहेतच शिवाय इलेक्ट्रीक वाहान पेट्रोलच्या तुलनेत परवडण्यासारखे आहे. पेट्रोल वाहानाच्या तुलनेत हे महाग असते त्यामुळे अनेक जण सर्वसामान्य लोकं खरेदी करताना विचार करतात. इलेक्ट्रीक वाहानांमध्ये बॅटरीची रेंज (EV Range Tips) हा मुख्य मुद्दा असतो. काही गोष्टींची काळजी घेतल्यास  तुमच्या कारची रेंज थोड्या प्रमाणात वाढू शकते. चला तर मग तर जाणून घेऊया अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या इलेक्ट्रीक कारची रेंज वाढवू शकाल.

वेग नियंत्रणात ठेवा

इलेक्ट्रिक कारमध्ये सामान्य गाड्यांप्रमाणे इंजिन आणि क्लच नसतात. त्यामुळे ही कार सामान्य कारपेक्षा वेगाने आणि आवाजाशिवाय धावते. म्हणून, जेव्हाही तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार चालवता तेव्हा लक्षात ठेवा की एक्सलेटर जास्त वेगाने दाबू नका. असे केल्याने कारची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते.

टायरचीही काळजी घ्या

तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक कारमधून कमी रेंज मिळत असल्यास गाडीचे टायरही नक्की तपासा. असे होऊ शकते की टायरमधील हवेचा दाब कमी आहे. त्यामुळे कारला चालताना जास्त ऊर्जा लागते. यामुळे कारच्या बॅटरीवरही जास्त दबाव येतो.

रिजनरेटिव्ह वैशिष्ट्ये वापरा

अनेक इलेक्ट्रिक कारमध्ये रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान दिले जाते. ज्यामध्ये अनेक स्तर देखील आढळतात. तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंगनुसार हे तंत्र वापरू शकता. रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक कारची रेंज काही किलोमीटरने सहज वाढवता येते.

योग्य मार्ग निवडा

जेव्हा तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार चालवता तेव्हा नेहमी तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ घेणारा मार्ग निवडा. तसेच त्या मार्गावर कमीत कमी रहदारी असावी. यासाठी तुम्ही तुमच्या कारमधील नकाशा वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही कारची बॅटरी वाचवू शकता आणि अधिक अंतर कव्हर करू शकता.

आवश्यक वस्तूच कारमध्ये ठेवा

काही लोकं अनावश्यक वस्तू आपल्या गाडीत ठेवतात आणि ते न काढता बराच वेळ गाडी चालवतात. असे केल्याने कारमध्ये जास्त सामान ठेवल्याने त्याचे वजन वाढते आणि इलेक्ट्रिक कारची रेंजही कमी होते.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.