AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Audi Q8 e-tron : आली जबरदस्त इलेक्ट्रिक कार! 600 किमीचा पल्ला गाठणार, होणार 31 मिनिटांत चार्ज

Audi Q8 e-tron : जर्मनीची वाहन उत्पादक, ऑडी कंपनीने भारतीय इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये दमदार एंट्री घेण्याची तयारी केली आहे. भारतीय बाजारात सध्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक कार दाखल होत आहे.

Audi Q8 e-tron : आली जबरदस्त इलेक्ट्रिक कार! 600 किमीचा पल्ला गाठणार, होणार 31 मिनिटांत चार्ज
| Updated on: Aug 19, 2023 | 10:25 AM
Share

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : भारतीय बाजारात सध्या एकाहून एक सरस इलेक्ट्रिक कार जलवा दाखवत आहेत. जर्मनीची प्रमुख वाहन निर्मिती कंपनी ऑर्डीने (Audi)नवीन कारसह भारतीय बाजाराचा दरवाजा ठोठावला आहे. नवीन इलेक्ट्रिक कार, Audi Q8 e-tron ला कंपनीने लाँच केले आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी या जोरावर ही कंपनी भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार आहे. कंपनीने अधिकाधीक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पोर्टबॅक (Sportback) व्हर्झन पण बाजारात उतरवले आहे. एकूण 4 व्हेरिएंट्समध्ये ही कार उपलब्ध होणार आहे. कंपनीने या कारचे बुकिंग पण सुरु केले आहे. त्यासाठी ग्राहकांना 5 लाख रुपयांची टोकन रक्कम जमा करावी लागेल. या कारची किंमत किती आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अर्थात दोन पॉवरफुल बॅटरी असल्याने, आधुनिक फीचर्समुळे या इलेक्ट्रिक कारची (Electric Car ) किंमत अधिक आहे.

एसयुव्ही आणि स्पोर्टबॅक

Audi Q8 e-tron ही दोन वेगवेगळ्या बॉडी टाईपमध्ये दाखल होत आहे. एक एसयुव्ही व्हर्जन आणि दुसरे स्पोर्टबॅक अशा दोन टाईपमध्ये या कार असतील. ही कार एकूण 9 एक्सटिरीअर आणि तीन इंटिरीअर शेड्समध्ये उपलब्ध होईल. मदीरा ब्राऊन, क्रोनोस ग्रे, ग्लेशिअर व्हाईट, मिथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅटनहट्टन ग्रे या रंगसंगतीत ही कार न्हाऊन निघणार आहे. तर इंटिरिअर थीममध्ये ओकापी ब्राऊन, पर्ल बेज आणि ब्लॅक कलरचा समावेश आहे.

किंमत किती?

  • कार व्हेरिएंट्स                                  किंमत रुपये (एक्स-शो रुम)
  • Audi Q8 50 e-tron                            1,13,70,000
  • Audi Q8 50 Sportback e-tron         1,18,20,000
  • Audi Q8 55 e-tron                             1,26,10,000
  • Audi Q8 55 Sportback e-tron         1,30,60,000

कशी आहे नवीन कार

ही नवीन कार नुकतीच अपडेट करण्यात आली आहे. ऑडीने कारचे डिझाईन आधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. मॉर्डन लूकमुळे गाडी आकर्षक दिसत आहे. मॉडिफाईड हेडलॅम्प्स जोरदार लूक देतो. Audi Q8 ई-ट्रॉन मध्ये ऑडीचा नवीन 2D लोगो देण्यात आला आहे. बंपर पण अधिक आकर्षक स्टाईल देण्यात आली आहे. या कारमध्ये 20 इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहे.

काय दिले फीचर्स

एसयुव्हीचे इंटेरिअर पूर्वीसारखेच आहे. या कारमध्ये सेंटर कंसोल वर दोन टचस्क्रीन सेटअप देण्यात आला आहे. इन्फोटेनमेंट सिस्टमसह 10.1 इंच स्क्रीन आणि HVAC कंट्रोलसाठी 8.6 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये ऑडीचे व्हर्चुअल कॉकपिट प्लस देण्यात आले आहे. ऑल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 16 स्पीकर बॅग अँड ओल्फसेन स्पीकर सिस्टम, पॅनोरमिक सनरुफ, फोन-झोन क्लायमेंट कंट्रोल आणि 360 डिग्री कॅमेरा पण देण्यात आला आहे.

कशी आहे बॅटरी

  1. Audi Q8 e-tronमध्ये दोन वेगवेगळे बॅटरी पॅक आहेत.
  2. एका व्हेरिएंटमधये 95kWh च्या क्षमतेची बॅटरी बॅक आहे.
  3. त्यामुळे 340bhp ची पॉवर मिळते. 664Nmचे टॉर्क जेनरेट होते.
  4. दुसरा बॅटरी पॅक 114kWh आहे. 408bhp पॉवर जेनरेट करते.
  5. सिंगल चार्जमध्ये ही कार 600 किलोमीटरची रेंज देते.
  6. DC फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार 31 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्ज होते.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.