AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोयोटा आणि मारूती कारला टक्कर देणार ही कार, 1 लीटरमध्ये देते 45 किमी मायलेज

चीनमधील ऑटोमोबाईल कंपनी Geely ने जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान प्रणाली सादर केली आहे. ज्यामध्ये कार थेट एका लीटरमध्ये 45 किमीचे मायलेज देते.

टोयोटा आणि मारूती कारला टक्कर देणार ही कार, 1 लीटरमध्ये देते 45 किमी मायलेज
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 17, 2026 | 3:36 PM
Share

चीनमधील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Geely Auto ने पारंपरिक हायब्रिड कार सेगमेंटमध्ये मोठा बदल घडवू शकणारी नवी तंत्रज्ञान प्रणाली सादर केली आहे. कंपनीने ‘i-HEV Intelligent Hybrid’ नावाचा अत्याधुनिक हायब्रिड सिस्टम विकसित केला असून, या तंत्रज्ञानामुळे एका लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 45 किलोमीटरपर्यंत अंतर कापता येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा आकडा विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण आतापर्यंत या सेगमेंटमध्ये जपानी कंपन्यांचा, विशेषतः Toyota चा दबदबा राहिला आहे.

Geely च्या या नव्या सिस्टमची चाचणी Emgrand या मॉडेलमध्ये करण्यात आली. चाचणीदरम्यान या कारने 100 किलोमीटर अंतर फक्त 2.22 लिटर इंधनात पूर्ण केले. म्हणजेच सुमारे 45 km/l इतके मायलेज मिळाले. जे या सेगमेंटमध्ये विक्रमी मानले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे.

भारतातील इंधन दर लक्षात घेतले तर या मायलेजमुळे दिल्ली ते मुंबईसारखा लांब प्रवास साधारण 3000 च्या आसपास पूर्ण होऊ शकतो. वाढत्या पेट्रोल दरांच्या पार्श्वभूमीवर ही तंत्रज्ञान सामान्य ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

AI-आधारित स्मार्ट टेक्नोलॉजी

Geely चा i-HEV सिस्टम केवळ मायलेजपुरती मर्यादित नाही,तर ती अत्याधुनिक स्मार्ट फीचर्सनी सुसज्ज आहे. यात AI-आधारित एनर्जी मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. जी रिअल टाइममध्ये तापमान, आर्द्रता आणि उंची यांसारख्या घटकांचा अभ्यास करून ऊर्जा वापर ऑप्टिमाइझ करते.

यामुळे कार प्रत्येक परिस्थितीत अधिक चांगली कामगिरी करताना जास्तीत जास्त मायलेज देऊ शकते. याशिवाय, या सिस्टममध्ये प्रगत संगणकीय क्षमता असल्यामुळे भविष्यातील अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हिंग फीचर्सलाही सपोर्ट मिळू शकतो. जे अनेक पारंपरिक हायब्रिड गाड्यांमध्ये सध्या उपलब्ध नाही.

2026 पासून अनेक मॉडेल्समध्ये लाँच

Geely कंपनी 2026 पासून ही नवी हायब्रिड टेक्नोलॉजी आपल्या विविध मॉडेल्समध्ये आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Preface, Monjaro, Starray आणि Emgrand यांचा समावेश असेल. कंपनीचा उद्देश ही किफायतशीर आणि प्रगत तंत्रज्ञान अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे.

तज्ज्ञांचे मत – मोठा टर्निंग पॉइंट

ऑटो इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, Geely चा हा उपक्रम हायब्रिड वाहन क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरू शकतो. ही सिस्टम अधिक शक्तिशाली मोटर, कमी इंधन खर्च आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह येते. जी जपानी कंपन्यांना थेट आव्हान देते.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं