AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टचा लूक पाहिलात का? ‘ही’ आहे लाँचिंगची तारीख

नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये 360 डिग्री कॅमेरा, नवीन अपहोल्स्ट्री, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सनरूफ आणि पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये ग्राहकांना मिळणार आहेत. यात ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, एअर प्युरिफिकेशन सिस्टम आणि मागील एसी व्हेंट्स देखील मिळेल.

नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टचा लूक पाहिलात का? ‘ही’ आहे लाँचिंगची तारीख
प्रतिनिधीक फोटो
| Updated on: Jun 03, 2022 | 2:29 PM
Share

ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motors) त्यांच्या सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही ह्युंदाई व्हेन्यू (SUV Hyundai Venue) ची फेसलिफ्ट 2022 सिरीज लाँच करणार आहे. त्याची तारीखही जाहीर झाली आहे. नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत, दुसरीकडे कारचा लूक देखील अतिशय आकर्षक असणार आहे. 16 जून रोजी ही नवीन कार लाँच (launching date) होणार आहे. लाँचिंगसाठी कंपनीने पूर्ण तयारी केली आहे. त्याचे पहिले मॉडेल कंपनीने 3 वर्षांपूर्वी 2019 मध्ये लाँच केले होते. गेल्या महिन्यातच या मॉडेलने 3 लाख युनिट्स विकण्याचा विक्रम केला आहे. नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये 360 डिग्री कॅमेरा, नवीन अपहोल्स्ट्री, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सनरूफ आणि पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये ग्राहकांना मिळणार आहेत. यात ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, एअर प्युरिफिकेशन सिस्टम आणि मागील एसी व्हेंट्स देखील मिळेल

लूकमध्ये मोठे बदल

कारच्या पुढील भागात ग्रील असल्यामुळे कारचा पुढचा भाग छान दिसतो आणि नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये कंपनीचे पॅरामेट्रिक डिझाइन ग्रील दिले असून त्यामुळे कारचा लूक क्रेटा आणि टस्कनच्या लूकसारखा असेल. याशिवाय एलईडी हेडलॅंप आणि नवीन डीआरएल याला आणखीनच आकर्षक बनवतात. त्याचबरोबर कंपनीने कारचा मागील लूक देखील बदलला आहे. त्यात कनेक्टिंग एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय कारच्या अलॉय व्हीलच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

व्हँटीलेटेड सीट

कंपनीने आपल्या कारच्या इंटिरिअरमध्येही अनेक बदल केले आहेत. व्हँटीलेटेड सीटचा पर्यायही नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासोबतच 360 डिग्री कॅमेरा, नवीन अपहोल्स्ट्री, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सनरूफ आणि पार्किंग सेंसर्स सारखे फीचर्सही कारमध्ये असतील. नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट आवृत्ती दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिनच्या पर्यायासह सादर केली जाऊ शकते.

पेट्रोल इंजिनमध्ये 1.2 लीटर आणि इतर 1.0 लीटर टर्बो GDI चा पर्याय देण्यात आला आहे. टर्बो इंजिनवर, ते 118 bhp कमाल पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क जनरेट करेल. तर कारला 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल जे 92bhp कमाल पॉवर आणि 240 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही मिळू शकतो.

काय असेल किंमत?

ह्युंदाई व्हेन्यूची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. ती बाजारात मारुती विटारा ब्रेझा फेसलिफ्ट, किआ सोनेट, महिंद्रा XUV300 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते. ह्युंदाई व्हेन्यूमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यात 6 एअरबॅग असतील. हिल स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्सही असतील.

Follow Us
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा