सेकंड हँड बाजारात या कार आणि बाईकने मारली बाजी, केवळ 47 हजारांत खरेदी केली मोटारसायकल

सेकंड हँड बाजारात या कार आणि बाईकने मारली बाजी, केवळ 47 हजारांत खरेदी केली मोटारसायकल
सेकंड हँड बाजारात या कार आणि बाईकने मारली बाजी

सेकंड हँड बाजारात या कार आणि बाईकने मारली बाजी, केवळ 47 हजारांच्या सरासरी किंमतीवर खरेदी केली मोटारसायकल (highest sales of these cars and bikes in the second hand market)

prajwal dhage

|

Feb 24, 2021 | 7:23 PM

मुंबई : भारतीय ग्राहकांमध्ये सेकंड-हँड वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. एका संशोधनानुसार, गेल्या काही वर्षांत सेकंड-हँड वाहनांच्या व्यवसायात बरीच वाढ झाली आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का कोणती सेकंड हँड कार आणि बाईक लोकांना जास्त पसंत आहे. नुकतीच, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणारी कंपनी ‘डूम’ने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात असे म्हटले आहे की, सेकंड-हँड गाड्यांमध्ये मारुती डिझायरला सर्वाधिक मागणी आहे. तर बाईकमध्ये बजाज पल्सर लोकांना जास्त आवडते. (highest sales of these cars and bikes in the second hand market)

मारुती डिझायर आणि बजाज पल्सरची सर्वाधिक विक्री

डूमने 2020 मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, वापरलेल्या कार मार्केटमध्ये लोकांनी मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट सेडान कार मारुती डिझायरकडून सर्वाधिक खरेदी केली आहे. तर दुसरीकडे बाईकच्या बाबतीत लोकांना बजाज पल्सर सर्वाधिक आवडली आहे. अहवालानुसार सेकंड-हँड कारची सरासरी किंमत 8,38,827 रुपये होती आणि दुचाकीची सरासरी किंमत 47,869 रुपये होती. विक्री केलेली बहुतेक वाहने ही 67 ते 77 महिने जुनी होती.

भारतीय कारला सर्वाधिक मागणी

या अहवालात असेही सांगितले गेले आहे की, लोकांनी बहुतेक देशांतर्गत कंपन्यांची वाहने खरेदी केली आहेत. या अहवालानुसार, विकल्या गेलेली 36 टक्के वाहने भारतीय कंपन्यांची आहेत. याशिवाय 22 टक्के जपानी कंपन्यांची, 18 टक्के जर्मन कंपन्यांची आणि जवळपास 12 टक्के दक्षिण कोरियाची वाहने होती.

डिझेल कारची सर्वाधिक विक्री

2020 मध्ये लोकांनी सेकंड-हँड कारमध्ये डिझेल कार अधिक विकत घेतल्या. अहवालानुसार लोकांनी 65 टक्के डिझेल वाहने, 34 टक्के पेट्रोल वाहने आणि केवळ एक टक्के सीएनजी वाहन खरेदी केले. या व्यतिरिक्त 65 टक्के स्वयंचलित ट्रान्समिशन असलेल्या मोटारींची निवड केली गेली आहे, तर मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या मोटारींचे प्रमाण 35 टक्के आहे.

व्हाईट, सिल्व्हर आणि ग्रे कलरला अधिक पसंती

अहवालानुसार, लोकांनी व्हाईट, सिल्व्हर आणि ग्रे रंगाची वाहने सर्वाधिक खरेदी केली. यामध्ये सुमारे 49 टक्के लोकांनी व्हाईट, 16 टक्के सिल्व्हर आणि 10 टक्के लोकांनी ग्रे रंगाची वाहने खरेदी केली. (highest sales of these cars and bikes in the second hand market)

इतर बातम्या

आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज, ओप्पोची नविन टेक्नोलॉजी

मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें