Honda City आणि Amaze खरेदीवर मिळवा मोठी सूट…. काय आहे डील?

सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात एकामागून एक वाहने दाखल होण्याच्या लाईनअपमध्ये आहेत. त्यात टोयोटा हायरायडर, मारुती सुझुकी ग्रँड विटारा अशा मोठ्या नावांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त, कंपन्या सप्टेंबरमध्ये ग्राहकांसाठी विविध नवीन ऑफरदेखील आणणार आहेत.

Honda City आणि Amaze खरेदीवर मिळवा मोठी सूट…. काय आहे डील?
होंडा सिटी
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 03, 2022 | 1:43 PM

होंडा (Honda) आपल्या सिटी मॉडेल्सच्या चौथ्या व्हेरिएंटच्या Honda WRV, Honda Jazz, Amaze आणि होंडा सिटी (Honda City) वर चांगली सूट देत आहे. होंडाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत कंपनी पाचव्या व्हेरिएंटमधील सिटी कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर करीत आहे. कंपनी या मॉडेलवर सर्वाधिक सूट देत आहे. यानंतर, कंपनी WRV या व्हेरिएंटवर सर्वाधिक डिस्काउंट (Discounts) ऑफर करीत आहे. तर दुसरीकडे कंपनी Honda च्या Jazz वर बऱ्यापैकी सूट देत आहे. त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना होंडाच्या मनपसंत कारवर मोठ्या प्रमाणात सुट मिळणार आहे.

कोणत्या मॉडेल्सवर किती सूट?

  1. Honda City च्या पाचव्या जनरेशन मॉडेलवर कंपनी 27,496 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
  2. कंपनी Honda च्या SUV WR-V वर 27 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.
  3. कंपनी Honda ची दुसरी कार Jazz वर 25 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.
  4. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत अमेझचे नाव समाविष्ट आहे.
  5. कंपनी Amaz वर 8,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
  6. होंडा चौथ्या जनरेशन सिटीवर 5 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.

सणासुदीच्या काळात डिस्काउंट

सध्या गणेशोत्सव सुरु आहे. यानंतर नवरात्रोत्सव दसरा, दिवाळी आदी मोठे सण लाईनअपमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कार निर्माता कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. होंडासह अनेक कार निर्मात्या कंपन्यांनी आपल्या विविध कार्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर केले आहे. त्याच सोबत प्रत्यक्ष सणांच्या मुहूर्तावरही यात अधिक वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

हे सुद्धा वाचा

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें