Honda Shine 100 vs Hero Splendor Plus यापैकी कोणती गाडी बेस्ट ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स

राकेश ठाकूर, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 17, 2023 | 6:01 PM

हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्यांच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये मोटरसायकल आणि स्कूटर सेगमेंटमध्ये स्पर्धा दिसून येते. Honda Shine 100 vs Hero Splendor Plus या दोन गाड्यांमध्ये कोणती वरचढ जाणून घ्या.

Honda Shine 100 vs Hero Splendor Plus यापैकी कोणती गाडी बेस्ट ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स
Honda Shine 100 vs Hero Splendor Plus यापैकी एक निवडायची आहे, मग ही बातमी वाचाच

मुंबई : हिरो आणि होंडा या दोन्ही कंपनींच्या बाइकची मोठी मागणी बाजारात आहे. काही वर्षे या कंपन्यांनी एकत्रितपणे भारतीय बाजारावर अधिराज्य गाजवलं. आता दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या असल्या तरी बाइकची मागणी काही घटलेली नाही. आजही दोन्ही कंपनींच्या गाड्यांचा मोठा खप आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने शाइन 100 लाँच करत 100 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये पाऊल टाकलं आहे. या गाडीचा सामना हिरो स्प्लेंडर प्लसशी आहे. जर तुम्हाला यापैकी एक गाडी निवडायची असेल तर तुम्ही त्याचा तुलनात्मक फरक जाणून घ्या.

Honda Shine 100 vs Hero Splendor Plus किंमत

होंडा शाइन 100 चं सिंगल व्हेरियंट असून याची किंमत 64,900 रुपये इतकी आहे. दुसरीकडे हिरो स्प्लेंडर प्लसमध्ये बरेच व्हेरियंट आहेत. या गाडीची किंमत 72,076 रुपयांपासून सुरु होते आणि 76,346 रुपयांपर्यंत (एक्स शोरुम, दिल्ली) आहे.

Honda Shine 100 vs Hero Splendor Plus इंजिन आणि गिअरबॉक्स

होंडा शाइन 100 मध्ये 99.7 सीसी सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फ्युल इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 7.6 बीएचपी आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे हिरो स्प्लेंडर प्लसमध्ये 97.2 सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फ्युल इंजेक्टेड मोटर आहे. हे इंजिन 7.9 बीएचपी आणि 8.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही गाड्या 4 स्पीड मॅन्युअर गिअरबॉक्सशी जोडलेल्या आहेत.

Honda Shine 100 vs Hero Splendor Plus हार्डवेअर आणि फीचर्स

दोन्ही गाड्यांमध्ये स्पोर्ट टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रियर ड्युअल स्प्रिंग लोडेड शॉकअब्जॉर्बर आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये ड्रिम ब्रेक सिस्टम आहे. फीचर्सचं सांगायचं तर शाइन 100 मध्ये बेसिक अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तर स्प्लेंडर प्लस डिजिटल कंसोलसह सादर केली आहे.

Honda Shine 100 vs Hero Splendor Plus डिझाईन आणि रंग

दोन्ही गाड्या दिसण्यास आकर्षक आहेत यात काही शंका नाही. ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच या गाड्यांचं डिझाईन केलं गेलं आहे. होंडा शाइन 100 पाच रंगात येते. तर हिरो स्प्लेंडर प्लस बारा रंगात उपलब्ध आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI