Hyundai : ह्युंडाई वेन्यू फेसलिफ्टचा नवीन लूक व्हायरल… काय असणार खास?

गाडी लाँच होण्याआधी काही फोटोज्‌ समोर आले आहेत. या फोटोंनुसार, 2022 ह्युंडाई वेन्यू आपल्या टेस्टिंगच्या लास्ट स्टेजवर असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिच्या इंटीरिअर आणि एक्सटीरिअर आदींमध्ये बरेच बदल केले जाणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Hyundai : ह्युंडाई वेन्यू फेसलिफ्टचा नवीन लूक व्हायरल... काय असणार खास?
Hyundai Venue Facelift Image Credit source: Hyundai
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:44 PM

ह्युंडाई (Hyundai) ही देशातील दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. ह्युंडाईचे अनेक मॉडेल ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये क्रेटा, वेन्यू सोबतच एसयुव्हीच्या अनेक मॉडल्सला लोकांनी अगदी डोक्यावर घेतले. आता मिड साइजच्या एसयुव्ही (SUV) आणि कॉम्पेक्ट एसयुव्ही आपल्या संबंधित फेसलिफ्ट मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काळात नवीन जनरेशनच्या टक़्सनला देखील अपडटेड कोना इलेक्ट्रिकसोबत आणण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ही गाडी अल्काझरला सोडून संपूर्ण एसयुव्ही रेंजच्या गाड्यांना रिफ्रेश करण्यासाठी मदत करणार असल्याचे बोलले जात आहे. वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी 2022 ह्युंडाई वेन्यू आणि क्रेटाची फेसलिफ्ट लवकरच लाँच (Launch) होण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये या गाड्या लाँच होतील अशी आशा आहे.

टेस्टिंगच्या लास्ट स्टेजवर…

गाडी लाँच होण्याआधी काही फोटोज्‌ समोर आले आहेत. या फोटोंनुसार, 2022 ह्युंडाई वेन्यू आपल्या टेस्टिंगच्या लास्ट स्टेजवर असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिच्या इंटीरिअर आणि एक्सटीरिअर आदींमध्ये बरेच बदल केले जाणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अपकमिंग क्रेटा फेसलिफ्टसाठी राहण्याचा अंदाज आहे. 2022 ह्युंडाई वेन्यू एन लाइनच्या केबिनला एन लाइन लोगो आणि रेड स्टिचसोबत एक ऑल ब्लॅक थीम सोबत लावण्यात आले आहे. याशिवाय 1.0 लीटर तीन सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजीन सोबत देण्यात येणार असून ते 120 पीएस आणि 172 एनएम पॉवर जनरेट करणार आहेत.

काय आहे नवीन?

एक्सटीरिअर हाइलाइट्‌समध्ये पॅरामीट्रिक ज्वेल पॅटर्न डिझाइनसोबत एक नवीन डिझाइन केलेले ग्रील सेक्शन, अपडेटेड स्प्लिट हेडलाइट्‌स, संशोधित फ्रंट बंपर, नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील, नवीन एल साइजचे एलईडी टेल लँप, फाक्स स्किड प्लेटसोबत रिवर्क्ड रिअर बंपर आदी देण्यात आले आहे. इंटीरिअरमध्ये एक ट्वीक्ड डॅशबोर्ड आणि सेंटर कंसोल, लेटेस्ट ब्लू लिंक कनेक्टिव्हिटी, एक मोठे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, नवीन सीट अपहोलस्ट्री आदी मिळण्याची आशा आहे. एका शक्यतेनुसार, भारतातला स्पोर्टियर स्टाइलसोबतच एन लाइन व्हेरिएंटदेखील मिळण्याची आशा आहे. यात कंट्रास्ट रेड एक्सेंट, वेगळे दिसणारे बंपर, ट्वीन एग्जास्ट आउटलेट मिळण्याची आशा आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.