Hyundai च्या दोन गाड्यांना क्रॅश टेस्टमध्ये 3 स्टार, जाणून घ्या किती सुरक्षित आहेत या गाड्या?

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टच्या लेटेस्ट राउंडमध्ये ह्युंडई क्रेटा (Hyundai Creta) या मिड साईज SUV ची टेस्ट घेण्यात आली आणि यामध्ये क्रेटाला थ्री स्टार रेट करण्यात आलं. टेस्टवेळी वापरलेला प्रोटोटाइप एंट्री-लेव्हल ई व्हेरिएंटचा होता.

Hyundai च्या दोन गाड्यांना क्रॅश टेस्टमध्ये 3 स्टार, जाणून घ्या किती सुरक्षित आहेत या गाड्या?
Hyundai Creta SUV
Image Credit source: Hyundai
अक्षय चोरगे

|

Apr 13, 2022 | 11:27 AM

मुंबई : ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टच्या लेटेस्ट राउंडमध्ये ह्युंडई क्रेटा (Hyundai Creta) या मिड साईज SUV ची टेस्ट घेण्यात आली आणि यामध्ये क्रेटाला थ्री स्टार रेट करण्यात आलं. टेस्टवेळी वापरलेला प्रोटोटाइप एंट्री-लेव्हल ई व्हेरिएंटचा होता, ज्यामध्ये साइड आणि कर्टन एअरबॅग्ज सारख्या सेफ्टी फीचर्सचा अभाव आहे. क्रेटाला अॅडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन टेस्टमध्ये (Adult Occupant Protection) थ्री स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. कारण कारचं बॉडी शेल अनस्टेबल असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. यासोबतच मिड साईज एसयूव्हीची (Mid Size SUV) बॉडी कोणत्याही प्रकारची हानी सहन करण्यास सक्षम नसल्याचेही मूल्यमापन करण्यात आले. कारचालकाच्या चेस्ट प्रोटेक्शनच्या बाबतीत कार किरकोळ सुरक्षा प्रदान करते तर हेड प्रोटेक्शन उत्तम आहे.

याशिवाय ड्रायव्हर आणि सहप्रवासी यांच्यासाठी मानेची सुरक्षा देखील चांगली असल्याचे दिसून आले. गुडघ्याच्या संरक्षणास किरकोळ दर्जा देण्यात आला कारण ते डॅशबोर्ड पॅनेलच्या मागील धोकादायक स्ट्रक्चरला धडकू शकतात. Adult Occupant Protection प्रमाणेच, चाइल्ड ऑक्युपन्सी प्रोटेक्शन टेस्टमध्येदेखील या कारला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

Hyundai Creta किती सुरक्षित आहे?

क्रेटाने 49 पैकी 28.29 गुण मिळवले आहेत. कारच्या सीटबेल्टने तीन वर्षीय डमीच्या डोक्याची फॉरवर्ड मूव्हमेंट नीटपणे रोखली नाही, सीटबेल्टने योग्य प्रकारे प्रतिबंध केला नाही, तर छातीचे संरक्षण देखील कमकुवत असल्याचे आढळले. बेस E ट्रिम ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज देत नसल्यामुळे, सीट्स सीटबेल्टने सुरक्षित कराव्या लागल्या. मागील बाजूस, 1.5 वर्षांच्या डमीला चांगले संरक्षण मिळते.

Hyundai Creta च्या GNCAP टेस्टचे परिणाम Kia Seltos सारखेच आहेत. दोन्ही गाड्या एकच प्लॅटफॉर्म शेअर करतात. क्रेटा ड्युअल फ्रंट एअरबॅगसह येते, स्टँडर्ड म्हणून EBD सह ABS, तर टॉप-स्पेक ट्रिम्स ESC, VSM, रियर डिस्क ब्रेक इत्यादीसह उपलब्ध आहेत. इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशनने नमूद केले आहे की, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि स्टँडर्ड ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स क्रेटामध्ये दिलेले नाहीत.

Hyundai i20 ला थ्री स्टार रेटिंग

Creta प्रमाणे, Hyundai i20 ने देखील GNCAP क्रॅश टेस्टमध्ये थ्री स्टार रेटिंग मिळवलं आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने नुकतीच एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे ज्यामुळे या वर्षी ऑक्टोबरपासून सर्व नवीन वाहनांसाठी सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात येतील. कारण भारतात सेफ्टी स्टँडर्ड्स आणि प्राधान्यक्रम सुधारत आहेत.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें