Hyundai i20 N Line भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

हुंडई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, आय 20 एन लाइन (i20 N Line) 24 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात दाखल होईल.

Hyundai i20 N Line भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Hyundai i20 N Line
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 6:59 AM

मुंबई : हुंडई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, आय 20 एन लाइन (i20 N Line) 24 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात दाखल होईल. नवीन मॉडेल मूलतः i20 हॅचबॅकचे परफॉर्मन्स स्पेशल व्हेरिएंट असेल, ज्यामध्ये स्टँडर्ड मॉडेलपेक्षा काही बदल पाहायला मिळतील. I20 N लाईनच्या टीझरमध्ये समोर आले आहे की, यात नवीन फ्रंट ग्रिल आणि ड्युअल-टिप एक्झॉस्ट मिळेल. एक्सटीरियर डिझाइनमध्ये एक रिस्टाइल फ्रंट बम्पर, साइड स्कर्ट्स आणि इंटिग्रेटेड डिफ्यूझरसह एक नवीन रियर बम्पर समाविष्ट असेल. (Hyundai i20 N Line ready to launch in India on August 24, check price and features)

Hyundai i20 N ला नवीन मशीन-कट डिझाईनसह 17 इंचाचे अलॉय व्हील्स मिळतील. नवीन रियर कलर पर्याय देखील दिले जातील आणि अर्थातच, फ्रंट आणि बॅकवर ‘एन लाइन’ बॅज असतील. तथापि, इंटिरियर स्टाइलमध्ये तितकासा बदल दिसणार नाही. डॅशबोर्डचे डिझाइन सारखेच राहील परंतु केबिनमध्ये ब्लॅक कलर स्कीम मिळण्याची शक्यता आहे. एक्सेलेरेटर आणि ब्रेक पेडल स्पोर्टी दिसणारे मेटल युनिट्स असतील आणि स्टीयरिंग व्हील नवीन थ्री-स्पोक युनिट असेल.

इतर वैशिष्ट्यांमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लू लिंक कनेक्टेड कार टेक, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग इत्यादींचा यात समावेश असेल.

Hyundai i20 N Line मध्ये काय असेल खास?

N Line i20 मध्ये एकच इंजिन पर्याय 1.0 लीटर टर्बो GDI मोटर असेल. स्टँडर्ड मॉडेल प्रमाणेच, ही मोटर जास्तीत जास्त 120 पीएस आणि 172 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. ही कार दोन ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असेल, म्हणजे 6-स्पीड IMT आणि 7-स्पीड DCT. पॉवर आकडेवारी प्रमाणित i20 पेक्षा वेगळी नसली तरी, एन लाईन व्हेरिएंट चालवणे अधिक मजेदार असेल कारण ह्युंडई स्पोर्टियर राइड-हँडलिंग बॅलन्ससाठी सस्पेंशन बदलेल. फील आणि फीडबॅक सुधारण्यासाठी स्टीयरिंगवरदेखील काम केले जाईल आणि नवीन एक्झॉस्टने इंजिनचा आवाज देखील सुधारेल.

असं म्हटलं जात आहे की, या कारची किंमत सुमारे 11 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होईल, जी नियमित i20 पेक्षा किंचित जास्त महाग आहे. i20 N Line ला सध्याच्या बाजारात, फोक्सवॅगन पोलो TSI आणि टाटा Altroz ​​i-Turbo या गाड्यांना टक्कर द्यावी लागेल.

इतर बातम्या

पीएम मोदींकडून नवीन स्क्रॅप पॉलिसी लाँच, टेस्टिंगनंतर कार जाणार भंगारात, गुंतवणुकीला चालना मिळणार

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम (EV) जारी, जाणून घ्या सर्वकाही

Kia कंपनी देशात अव्वल, होंडा-फोर्डचे डीलर्स असंतुष्ट; डीलर सर्वेक्षणात खुलासा

(Hyundai i20 N Line ready to launch in India on August 24, check price and features)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.