Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाख रुपयांचा बंपर डिस्काऊंट, Santro, Aura आणि इलेक्ट्रिक कारचाही समावेश

ह्युंदाय मोटर इंडियाने (Hyundai Motor India) त्यांच्या काही गाड्यांवर स्पेशल डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे.

Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाख रुपयांचा बंपर डिस्काऊंट, Santro, Aura आणि इलेक्ट्रिक कारचाही समावेश
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:47 PM

मुंबई : ह्युंदाय मोटर इंडियाने (Hyundai Motor India) फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या काही गाड्यांवर स्पेशल डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे. ऑटोमेकर कंपनीने म्हटलं आहे की, अनेक गाड्यांवर 1.5 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जाईल. ह्युंदाय कंपनी SUVs वरही डिस्काऊंट देत आहे. कंपनी कमीत कमी 50,000 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. डिस्काऊंट दिल्या जाणाऱ्या कार्सच्या यादीत ह्युंदाय कोना इलेक्ट्रिक SUV या कारचाही समावेश आहे. (Hyundai offering Rs 1.5 lakh discount on Kona EV: Aura, Nios, Santro offers in February 2021)

ह्युंदायची एंट्री लेव्हल कार असलेल्या सँट्रोवर कंपनीने 50 हजार रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. सोबतच 3 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देण्यात आली आहे. कंपनीने ग्राहकांना रोडसाईड असिस्टन्स देण्याची घोषणा केली आहे. सँट्रो भारतीय मार्केटमध्ये Maruti Wagon R आणि Tata Tiago सारख्या कार्सना टक्कर देते.

डिस्काऊंट देण्यात आलेल्या कार्सच्या यादीत सँट्रोनंतर पुढचा नंबर ग्रँड i10 नियॉसचा आहे. ग्रँड i10 Nios हॅचबॅकवर 60,000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही वेरिएंट्सचा समावेश आहे. या यादीत तिसरा नंबर आहे ह्युंदाय Aura या कारचा. ह्युंदायने Aura या कारवर कंपनीने 70,000 रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे.

इलेक्ट्रिक कारवरही डिस्काऊंट

हुंडई कोना इलेक्ट्रिक (Hyundai Kona EV) ही कार 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. या कारच्या मॉडलमध्ये आग लागण्याच्या भीतीपोटी कंपनीने रिकॉलचा (गाड्या परत मागवण्याचा निर्णय) निर्णय घेतला होता. त्यावेळी कंपनीने म्हटलं होतं की, या कारच्या बॅटरीमध्ये काही दोष आढळले आहेत, त्यामुळे आम्ही या गाड्या परत मागवत आहोत. दरम्यान, आता कंपनीने नवीन कोना फेसलिफ्ट इलेक्ट्रक ही कार ग्लोबली लाँच केली आहे, सोबतच अनेक नवीन फीचर्सही दिले आहेत.

ह्युंदाय कोना ही कार लवकरच भारतात लाँच केली जाणार आहेत. या कारवर कंपनी तब्बल 1,50,000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. ह्युंदाय कंपनी कोना EV फेसलिफ्ट 2021 च्या रुपाने भारतात पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये ही कार ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार लुक्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जबरदस्त सिद्ध होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या गाड्यांवर डिस्काऊंट

    • ह्युंदाय Santro – 50,000 रुपयांचा डिस्काऊंट
    • ह्युंदाय ग्रँड i10 Nios – 60,000 रुपयांचा डिस्काऊंट
    • ह्युंदाय Aura – 70,000 रुपयांचा डिस्काऊंट
    • ह्युंदाय Elantra- 1,00,000 रुपयांचा डिस्काऊंट
    • ह्युंदाय कोना इलेक्ट्रिक – 1,50,000 रुपयांचा डिस्काऊंट

हेही वाचा

भारतात ‘या’ गाड्या 3 लाख रुपयांपेक्षा स्वस्त; देशात सर्वाधिक पसंती

बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी LG आता इलेक्ट्रिक कार बनवणार; काय असेल खास?

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

(Hyundai offering Rs 1.5 lakh discount on Kona EV: Aura, Nios, Santro offers in February 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.